पोतेवाडी जलजीवन च्या बातमीमुळे अधिकारी व ठेकेदार यांचे धाबे दणाणले जामखेड तालुक्यातील अनेक गावातील ग्रामस्थ तक्रार देण्यासाठी येणार पुढे

0
597

जामखेड न्युज——

पोतेवाडी जलजीवन च्या बातमीमुळे अधिकारी व ठेकेदार यांचे धाबे दणाणले

जामखेड तालुक्यातील अनेक गावातील ग्रामस्थ तक्रार देण्यासाठी येणार पुढे

जलजीवन योजनेचा काही ठिकाणी ठेकेदार व अधिकारी यांनी संगनमताने निधी हडप करत बोगस कामे तर काही ठिकाणी कागदावर कामे दाखवून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी हडप केला आहे. गावोगावी कोट्यवधी रुपये खर्च करूनही ग्रामस्थ पाण्यावाचून वंचित आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरूच आहे. जामखेड न्युजने काल पोतेवाडी जलजीवन कामाची बातमी लावली होती तेव्हा अनेक गावातील ग्रामस्थांनी फोन करून सोशल मीडियावर संदेश पाठवत कोट्यवधी रुपयांची योजना गावासाठी केली पण गावात पिण्याचे पाणी नाही. याविषयी तक्रार करणार असल्याचे सांगितले. यामुळे अधिकारी व ठेकेदार यांचे धाबे दणाणले आहेत.

जामखेड तालुक्यातील पोतेवाडी येथील गावच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवर खाजगी तीन मोटारी गावाला पाणी देण्याऐवजी शेतातील पिकांना पाणी ही बातमी जामखेड न्युजने प्रसिद्ध केली होती या बातमीवर फोन करून किंवा सोशल मीडियावर खुपच प्रतिक्रिया येत आहेत आमच्या ही गावात असेच आहे. अनेक ठिकाणी सरपंचाच्या शेतीला पाणी तर गाव तहानलेले अशी परिस्थिती आहे. अनेक गावातील तरुण पुढे येऊन तक्रार देऊ लागले आहेत अनेक जण तक्रार देणार आहेत.

जामखेड तालुक्यात अनेक ठिकाणी मनरेगा अंतर्गत विहिर घेताना जवळ पाचशे मीटर विहीर नको हा नियम धाब्यावर बसवून अधिकारी यांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केले आहे. व मंजुरी दिलेल्या आहेत. अनेकांनी जुनी विहीर दाखवून पैसे उचलले आहेत. यात अधिकारी व ठेकेदार मालामाल झाले आहेत तर ग्रामस्थ पाण्यावाचून बेहाल आहेत.

ठेकेदाराने मनमानी कारभाराने ही योजना कशीबशी एक दीड फुटापर्यंत पाईप गाढले आहेत काही ठिकाणी तर पुढच्या कडेला आणि मागच्या कडेलाच पाईप गाढले आहेत मध्ये एकही पाईप गाढलेला नाही अशा पद्धतीने ही योजना कागदावरतीचं रंगून घाईगडबडीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना बिल अदा केले आहे, योजना चालू करताना भूजल सर्वेक्षणांनी देखील खोटे दाखले देऊन ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे.

पोतेवाडी येथील गणेश (बंडू) नामदेव सगळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अहिल्यानगर यांना दिलेल्या निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. तशी अनेक गावातील ग्रामस्थ मागणी करणार आहेत. यामुळे अधिकारी व ठेकेदार यांचे धाबे दणाणले आहेत. चौकशीत सत्य प्रकार उघडकीस येणार आहे.

चौकट
शासकीय योजनेतून विहीसाठीचे नियम अधिकारी वर्गाला हाताशी धरून धाब्यावर बसवून पाणीपुरवठा योजनेच्या विहीरीच्या पन्नास फूट अंतरावर विहीर कशी मंजूर झाली. तसेच गावात पाणीटंचाई असताना या विहिरीचे पाणी स्वत च्या शेतात. याचबरोबर मुख्य पाईपलाईन स्वत ची पाईपलाईन जोडून या विहिरीचे पाणी स्वत च्या शेततळ्यात असा सगळा प्रकार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here