जामखेड न्युज—–
भाजपा कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळेच जामखेडच्या बारा गावातून मोठ्या मताधिक्याने दशरथ हजारे यांचा विजय
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या निवडणुकीत जामखेड तालुक्यातील बारा गावातून विधानपरिषदेचे सभापती प्रा . राम शिंदे यांचे जवळा येथील कट्टर समर्थक ज्योती क्रांती सोसायटीचे उपाध्यक्ष दशरथ हजारे यांनी मोठे मताधिक्य मिळवत विजय संपादन केला आहे.

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जामखेड तालुक्यातील जवळा, नान्नज, सह बारा गावे येतात. या कारखान्याचे जामखेड तालुक्यात तीन हजार सभासद या बारा गावांतील आहेत.

ही निवडणुक कारमाळ्याचे आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार संजय शिंदे यांच्या पॅनल मध्ये झाली, यामध्ये आमदार पाटील यांचे सर्व उमेवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. यामध्ये आमदार पाटील यांचे जवळा येथिल उमेदवार दशरथ हजारे हेही विजयी झाले.

यांनी तब्बल ७ हजार ९३३ मतांनी निवडून आले. चोंडी येथील विलास जगदाळे यांचा दारुण पराभव केला. हजारे यांच्या विजयासाठी जामखेड तालुक्यातील भाजपाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. हजारे हे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे समर्थक आहेत भाजपा व कार्यकत्यांनी हजारे यांच्या विजयासाठी मोठे प्रयत्न केले.

हजारे यांच्या विजयासाठी जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले , मधुकर (आबा) राळेभात, भाजपाचे तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे, जवळ्याचे सरपंच सुशील आव्हाड, उपसरपंच प्रशांत शिंदे, सोमनाथ पाचरणे, रवि सुरवसे, युवा नेते अक्षय वाळुंजकर, पांडुरंग उबाळे , उदयसिंह पवार, डॉ. पांडुरंग हजारे, सरपंच बाबा महारनवर, उमेश रोडे ,डाॅ किसन राऊत, राहुल पाटील, प्रशांत पाटील, नितीन कोल्हे, अमोल हजारे, मारुती रोडे, विष्णु हजारे, रामलिंग हजारे,अतुल शिंदे , सरपंच दत्तात्रय शिंदे , शिवराज देवमुंडे , सरपंच राम पवार , अंबादास पवार , पांडुरंग हजारे,पुरुषोत्तम वाळुंजकर, किरण वर्पे, राजेंद्र राऊत, अभय नाळे, मुरलीधर हजारे ,अय्युब शेख, संतराम सुळ, अविनाश ढवळे, सुखदेव मते, पांडुरंग उबाळे, अशोक दादा देवकर, करण ढवळे, ओमासे, महेंद्र मोहळकर, अनिल हजारे, सतिष शिंदे, जालिंदर चव्हाण, बाळासाहेब मते, डाॅ बोराटे, बाळासाहेब चव्हाण यांच्या सह अनेकांनी मताधिक्यासाठी
प्रयत्न केले.
चौकट
मी सर्वसामान्य शेतकर्यांचा मुलगा असल्याने जामखेड तालुक्यातील बारा गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेणार आहे. असे मत नवनिर्वाचित संचालक दशरथ हजारे
संचालक आदिनाथ सहकारी साखर कारखाना
यांनी जामखेड न्युज शी बोलताना सांगितले.
जामखेड तालुक्यातील बारा गावांतील शेतक-यांना आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून हक्काचा साखर कारखाना उपलब्ध आहे. जामखेड तालुक्यातील बारा गावांतील दशरथ हजारे यांच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळेल.






