Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या रमाई युवा मंच सातेफळ तर्फे विविध पुरस्कार प्रदान सहायक पोलीस निरीक्षक...

रमाई युवा मंच सातेफळ तर्फे विविध पुरस्कार प्रदान सहायक पोलीस निरीक्षक यांच्यासह पत्रकार, शिक्षक, उद्योजक, कृषीतज्ञ, साहित्यिक यांना पुरस्कार

0
629

जामखेड न्युज——–

रमाई युवा मंच सातेफळ तर्फे विविध पुरस्कार प्रदान

सहायक पोलीस निरीक्षक यांच्यासह पत्रकार, शिक्षक, उद्योजक, कृषीतज्ञ, साहित्यिक यांना पुरस्कार

रमाई युवा मंच सातेफळ ता जामखेड जि अहिल्यानगर यांच्या वतीने १६ एप्रिल २०२५ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

खर्डा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक मा विजयजी झंजाड यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार,भूमिपुत्र अंकुश सदाफुले सेवानिवृत्त कारागृह अधीक्षक यांना यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार, भूमिपुत्र गुलाब सदाफुले सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार,भूमिपुत्र अरुण सदाफुले व खर्डा येथील भिमराव घोडराव यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर धम्म गौरव पुरस्कार, खर्डा येथील साहित्यिक व पत्रकार बाळासाहेब शिंदे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार,

श्वेता गायकवाड खर्डा यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मुकनायक पत्रकार पुरस्कार, गणेश देवकाते सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शिक्षक पुरस्कार, भूमिपुत्र शहाजी भोसले सातेफळ यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषिभूषण पुरस्कार, भूमिपुत्र अजिनाथ लटके यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्योरत्न पुरस्कार, हरिबा चांदगावे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट बचतगट कार्य पुरस्कार, देण्यात आले. तर ग्रामविकास अधिकारी युवराज ढेरे यांना ग्रामसेवक महासंघाचे जिल्हाध्यक्ष झाले बद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले
सर्व पुरस्कार्थीना मा गोकुळ गायकवाड साहित्यिक जामखेड यांचे शुभहस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.


यावेळी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भाषण करत उपस्थितांची मने जिंकली. अंकुश सदाफुले, गुलाब सदाफुले, अरुण सदाफुले यांनी विद्यार्थ्यांना सुमारे वीस हजार रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमाई युवा मंच सातेफळचे काशिनाथ सदाफुले (ग्रामपंचायत सदस्य), पनवेल नवी मुंबई चे पोलीस संदीप सदाफुले, बबन सदाफुले, अजित सदाफुले, अर्जुन सदाफुले,दिपक सदाफुले, राम घोडराव,अशोक सदाफुले, भाऊसाहेब सदाफुले, लखन सदाफुले,निळकंठ सदाफुले, वामन सदाफुले,विजय सदाफुले,तुषार सदाफुले,दादा मोरे,बाबू घोडराव,समाधान घोडराव,नितीन सदाफुले,दगडु सदाफुले,संत सदाफुले,हरी सदाफुले,सोनबा सदाफुले,जालिंदर सदाफुले,अनिकेत सदाफुले,स्वप्नील सदाफुले,प्रेम सदाफुले,संतोष सदाफुले,विनोद सदाफुले, आणि रमाई बचतगट आदीं भीम सैनिकांनी अथक परिश्रम घेतले. विकास पाचरणे व बाळासाहेब शिंदे यांनी उत्कृष्ट सुत्रसंचलन केले.

दर वर्षी या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.त्यामुळे रमाई युवा मंचचे सर्वत्र कौतुक केले जात आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!