जामखेड न्युज——
-
वैभवाच्या यशाने साकतच्या शिरपेचात मानाचा तुरा – संजय वराट
वैभव वराट ची एमपीएससी परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार संपन्न
वैभव वराट ची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली वैभव शच्या निवडीचा आनंद गावाला झालेला आहे. आणि आता गावाला एक दिशा मिळाली आहे. सातत्य, चिकाटी व मेहनती मुळे हे यश संपादन झाले आहे. गावातील मुले सर्वच क्षेत्रात प्रगती करत आहेत. राजकारणा बरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रात साकतचा दबदबा निर्माण झाला आहे. वैभवने कायद्याच्या माध्यमातून वंचित लोकांना न्याय द्यावा असे आवाहन संजय वराट यांनी केले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत वैभव वराट ची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली यानिमित्त गावात भव्य मिरवणूक व नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी संजय वराट, हभप उत्तम महाराज वराट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, सरपंच सर्जेराव पाटील, उपसरपंच राजाभाऊ वराट, माजी प्राचार्य श्रीराम मुरूमकर, कांतीलाल वराट, सुरेश वराट, शहादेव वराट, राजकुमार थोरवे, दादासाहेब मोहिते, भरत लहाने, सुर्यकांत ढवळे, पोलीस पाटील महादेव वराट, विठ्ठल वराट, दिनकर मुरूमकर, सदाशिव वराट, महादेव वराट, नानासाहेब लहाने, विष्णू लहाने, अजित वराट, ढवळे गुरूजी, त्रिंबक पवार, नवनाथ बहिर, ऋषिकेश पाटील, गणेश वराट, हरीभाऊ वराट, महेश मुरूमकर, प्रकाश घोलप, बळीराम मेहर , विजयकुमार रेणुके, शिवचंद वराट, गणेश मुरूमकर रामहरी वराट, सचिन वराट, गणेश मुरूमकर, बिभीषण वराट, हरीभाऊ मुरूमकर, निवृत्ती वराट, अरूण मुरूमकर, नारायण लहाने यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना हभप उत्तम महाराज वराट म्हणाले की, वैभव च्या वाडवडिलांची पुण्याई कामाला आली तीन पिढ्या पोलीस खात्यात नोकरी करत आहेत. त्याच्या हातून चांगले काम घडो.
यावेळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट म्हणाले की, वैभव च्या रूपाने साकतची मान महाराष्ट्रात उंचावली आहे. वैभव ने गावातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरूणांपुढे आदर्श निर्माण केला आहे.वैभव ने खडतर अभ्यास केला. अपयश आले तरी न खचता पुन्हा प्रयत्न केला सर्व संकटावर मात करून एमपीएससी सर केली आहे.

यावेळी बोलताना माजी प्राचार्य श्रीराम मुरूमकर म्हणाले की, साकतच्या वैभवात वैभवने भर टाकली आहे. आगोदर ऊसतोड कामगारचे गाव नंतर शिक्षकांचे गाव, नंतर डॉक्टर नंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत आहेत.
ही उल्लेखनीय बाब आहे. वैभव खुप संयमी आहे. जिद्द, चिकाटी व संयम असावा लागतो हे वैभव कडे आहे त्यामुळे एमपीएससी सर केली आहे. गावाने आदर्श घ्यावा असे काम वैभव ने केले आहे.
नागरी सत्काराला उत्तर देताना पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेला वैभव वराट म्हणाला की, मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अपयश आले पण खचून न जाता पुन्हा प्रयत्न करत यश मिळवले आहे. मी अभ्यास करताना आई वडीलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवले आणि अभ्यास केला यामुळे यश मिळाले आहे. आई वडिलांप्रमाणे मित्रांचेही सहकार्य लाभले. कष्टाशिवाय यश मिळत नाही. चांगले शिक्षण घ्या यामुळे प्रतिष्ठा मिळते
कोणत्याही क्षेत्रात काम करा सर्वोत्तम काम करा व आपल्या गावाला अधिकाऱ्याचे गाव म्हणून नावलौकिक मिळावा अशी इच्छा व्यक्त केली.

यावेळी नवनाथ बहिर, दिनकर मुरूमकर, मामा सुर्यकांत ढवळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. दादासाहेब मोहिते यांनी केले.