साकत सप्ताहात हभप प्रकाश महाराज बोधले यांची किर्तन सेवा संपन्न उद्या प्रकाश महाराज बोधले यांच्या  काल्याच्या कीर्तनाने होणार सप्ताहाची सांगता

0
225

जामखेड न्युज——–

साकत सप्ताहात हभप प्रकाश महाराज बोधले यांची किर्तन सेवा संपन्न

उद्या प्रकाश महाराज बोधले यांच्या  काल्याच्या कीर्तनाने होणार सप्ताहाची सांगता

प्रतिपंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साकतमध्ये अखंड हरिनाम सप्ताहास सोमवार दि २४ रोजी सुरू होत आहे. यात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच तुकाराम महाराज चरित्र, काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, गाथा भजन, हरिपाठ, किर्तन व नंतर गावजेवण व हरिजागर असे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. सप्ताहाची सांगता सोमवार ३१ रोजी होणार आहे. आज रविवार
दि ३० रोजी हभप गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांनी किर्तन सेवा संपन्न झाली किर्तन सेवेसाठी पुढील अभंग निवडला होता.

आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा।
माझियां सकलां हरिच्या दासा ।।१।।
कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ।
ही संतमंडळी सुखी असो।।२।।
अहंकाराचा वारा न लागो राजसा।
माझ्या विष्णुदासा भाविकांसी।।३।।
नामा म्हणे तयां असावे कल्याण।
ज्या मुखी निधान पांडुरंग।।४
– संत नामदेव


नामदेव राय महाराज म्हणतात, आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । माझिया सकळा हरिच्या दासा ॥ हे पंढरीनाथा, पांडूरंगा त्या कुळांचं आयुष्य आकल्प असू दे ज्या कुळांमधून भगवत्‌ भक्त जन्माला आले आणि जे दास झाले माझ्या हरिचे.. अशा भक्ताचं रक्षण करण्यासाठी कल्याण, हित व उध्दार करण्यासाठी मी ही मागणी तुमच्याकडे करतो आहे.


संपूर्ण विश्वासाठी जगाच्या कल्याणासाठी मागणी मागतांना संत वृत्तीच्या माणसांसाठी नामदेवांनी मागणीपर अभंगाची रचना केली आहे.


जामखेड तालुक्यातील साकत येथे अखंड विणा वादणास व नंदादीपास ७० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गुरुवर्य हभप प्रकाश महाराज बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि. २४ पासून सुरू झाला आहे व सोमवार दि. ३१ रोजी सांगता होणार आहे.

सप्ताहातील दैनिक कार्यक्रम पुढील प्रमाणे होते
पहाटे ४ ते ६ काकडा भजन,
सकाळी ६ ते ७ विष्णू सहस्रनाम,
सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण,
सकाळी १० ते १२ गाथा भजन,
दुपारी ३.३० ते ५ पर्यंत तुकाराम चरित्र,
५.३० ते ६.३० हरिपाठ,
रात्री ७ ते ९ किर्तन व नंतर गावजेवण

उद्या सोमवार दि ३१ रोजी सकाळी ९ ते १२ हभप गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांचे काल्याचे किर्तन होईल. अशी माहिती संयोजक हभप भीमराव महाराज मुरूमकर व हभप बाबा महाराज मुरूमकर यांनी दिली.

गायनाचार्य म्हणून हभप हरिभाऊ महाराज काळे, हभप माऊली महाराज कोल्हे, काका महाराज निगुडे, पंढरीनाथ महाराज राजगुरू, हभप दिनकर महाराज मुरूमकर, गहिनीनाथ सकुंडे, अशोक महाराज सपकाळ व गुरुवर्य रामचंद्र बोधले महाराज फडावरील गायक मंडळी हजर राहतील.
मृदुंगाचार्य हभप भारत महाराज कोकाटे, हभप प्रमोद महाजन पदमुले, बाजीराव महाराज वराट, उत्रेश्वर महाराज वराट, शंकर महाराज माळी, रोहन गवळी, रोहित गवळी दिपक अडसूळ, विक्रम महाराज खुळे, सुनील भालेराव, श्रीराम भालेराव, महादेव गवळी, चोपदार आश्रू सरोदे, आजीनाथ पुलवळे असतील.

सप्ताहासाठी मंडप सौजन्य अनिल साहेबराव वराट इंदोर मध्यप्रदेश यांचे राहिल, फोटो ग्राफर ओम दळवी तसेच जाहिरात सौजन्य कै. ओम अशोक वराट यांच्या स्मरणार्थ अशोक कुंडलीक वराट असतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here