राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराच्या चुकीने अपघाताची मालीका सुरूच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारींमुळे जखमींना लवकर वैद्यकीय उपचार

0
2111

जामखेड न्युज—–

राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराच्या चुकीने अपघाताची मालीका सुरूच

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारींमुळे जखमींना लवकर वैद्यकीय उपचार

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग संथगती कामामुळे अनेक अपघात झाले आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या रस्त्याबरोबरच नगर रोडचे चिंचपूर ते जामखेड काम सुरू आहे. ठेकेदाराच्या चुकीमुळे अर्धवट काम, दिशादर्शक बोर्ड नसणे, रेडियम नसणे, खाचखळगे, रात्रीच्या वेळी न दिसल्याने अनेक अपघात होत आहेत. रात्री असाच एक अपघात झाला यातील जखमींना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी ताबडतोब दवाखान्यात दाखल केले यामुळे जखमींना लवकर वैद्यकीय उपचार मिळाले व प्राण वाचले.


अहिल्यानगर रस्त्याचे काम धिम्या गतीने चालू असून खूप ठिकाणी रस्त्याचे अधुरे काम आहे बऱ्याच ठिकाणी खटक्या पडल्या आहेत यामुळे होतात अपघात रात्री एक वाजता दोन चार चाकी वाहनांना रस्ता लक्षात न आल्याने हॉटेल सेलिब्रेशन आणि हॉटेल एम एच १६ यांच्यासमोरील बाजूस जोरात धडक झाली यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले.

असून सदरची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना मिलिंद मोरे यांनी दिली कोठारी हे ताबडतोब रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी आपल्या कार्यकर्त्यांसह दाखल झाले सदर जखमींना आणून दवाखान्यात दाखल केले असून त्यांच्या नातेवाईकांची बोलणे झाले आहे ते नगर जिल्ह्यातील आहेत


त्यांची नावे खालील प्रमाणे कल्याण गवळी वय २५ मुक्काम पोस्ट सांडवे तालुका जिल्हा अहिल्यानगर तसेच कुमार खांदवे व ४६ मुक्काम पोस्ट सांडवे तालुका जिल्हा अहिल्यानगर व्हॅगनार गाडी क्रमांक एम एच १२ के. जे. ८८६७ असून पिकप गाडी श्रीरामपुर वरुन दुध घेउन जामखेड ला येत होता नंबर एम एच ६७ बी वाय ४०६७ असा असून रस्ता रुंदीकरण काम चालू असून समोर समोर धडक झाल्याने गाडी चक्काचूर झाले आहे कोठारी पेट्रोल पंप ते चिंचपूर पर्यंत रोड खूप खराब झालेला आहे.

रोडचे काम बऱ्याच दिवसापासून चालू असून खूप संथगतीने काम चालू आहे. कोठारी पेट्रोल पंप– कर्जत कडून– येणारा रोड — आणि नगर कडे जाणारा रोड या चौफुला (पंचदेवालय) ठिकाणी खूप मोठे खड्डे झालेले आहेत या रोडचा कोणताच ठेकेदार लक्ष देत नाही आठ दिवसापूर्वीच तिथे एका मोटरसायकल वाल्यांचा अपघात झाला
होता तोही गंभीर जखमी झाला होता.

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनीच रात्री अकरा वाजता जखमींना दवाखान्यात दाखल केले होते या रोडला आता अपघाताची मालिका थांबत नाही अशी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी खंत व्यक्त केली तेथील राहणारे लोक म्हणतात रोज एक तरी अँक्सिडेंट होत आहे रस्ता लक्षात येत नाही दिशादर्शक फलक लावलेले नाहीत तरी संबंधित अधिकाऱ्यांनी अथवा ठेकेदाराने लक्ष द्यावे सदर अपघाताच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना जखमी ना रुग्णवाहिकेत टाकण्यास मदत मिलिंद मोरे, विशाल ढवळे, किरण गुरव, बबन चंदन, शिवा अंधारे आणि उपस्थित ग्रामस्थांनी मदत केली. 

सदर माहिती सामाजिक कार्यकर्ते यांनी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिली असून दिनेश गंनगे पुढील तपास करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here