जामखेड न्युज—–
सूर्याच्या प्रकाशालाही लाजवेल असे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचे बलीदान
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त मूक पदयात्रा काढून छावा चित्रपटाने केला समारोप, हजारो नागरिक उपस्थित
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने महिनाभर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मरणार्थ उपवास पाळले जातात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी देव, देश, धर्मासाठी तब्बल ३० दिवसाचे सूर्याच्या प्रकाशालाही लाजवेल असे तेजस्वी बलिदान दिले म्हणजेच छत्रपती श्री संभाजी महाराज मृत्यूच्या दिशेने बलिदानाच्या मार्गावर संपूर्ण महिनाभर रोजच अति धीरोदत्त पणे चालत होते.
म्हणून या संपुर्ण महिन्यामध्ये म्हणजे फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून ते फाल्गुन असे पर्यंत सर्व धारकरी व शिवभक्तांकडुन बलिदान मास पाळला गेला शेवटी बलिदान च्या दिवशी म्हणजेच फाल्गुन अमावस्येला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधीस्थळ वढू बुद्रुक या ठिकाणाहून आणलेल्या ज्वाला घेऊन शंभूराजांच्या न निघालेल्या अंत्ययात्रेच्या व बलिदानाच्या स्मरणार्थ जामखेड शहरातुन मूक पदयात्रा २९ मार्च काढण्यात आली.
यामध्ये शिवभक्त तरुण ग्रामस्थ सहभागी झाले.
मूकपद यात्रा शनी मंदिर,- जय हिंद चौक- खर्डा चौक -तपनेश्वर गल्ली- बीड रोड- कोर्ट रोड – राळेभात गल्ली -महादेव गल्ली- लक्ष्मी चौक सविधान स्तंभ -विठ्ठल मंदिर- छत्रपती शिवाजी महाराज पेठ या मार्गे काढून समारोप तहसील कार्यालय येथे करण्यात आला. अतिशय शिस्तीत शिवभक्त धारकरी सहभागी झाले.
शेवटी सायंकाळी आठ वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील छावा सिनेमा श्री शिवराज्याभिषेक उत्सव समिती मार्फत दाखवण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने माता-भगिनी ग्रामस्थ उपस्थित होते.
चांगले उपक्रमाचे जामखेडकरांनी कौतुक केले.
श्रीशिवप्रतिष्ठानचे तालुका प्रमुख पांडुराजे भोसले यांनी मार्गदर्शन केले यावेळी बोलताना म्हणाले की आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरूजींनी हा धर्मवीर बलीदान मास हिंदुस्थानातील ज्या ज्या गावात सुर्य ऊगवतो त्या त्या गावात व प्रत्येकाच्या घरातील आई, वडील,भाऊ, बहीन, कुटुंबीक पातळीवर हा धर्मवीर बलीदान मास अत्यंत कडवट पणे पाळला पाहीजे,