साकतच्या वैभव बळीराम वराट ची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड
जामखेड तालुक्यातील साकत येथील वैभव बळीराम वराट याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. यामुळे त्याचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
वैभव चे वडील बळीराम वराट हे एसआरपी ची सेवा करून परत पोलीस म्हणून सेवा केली होती. वर्षापूर्वी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. आई गृहिणी आहे. वैभवने पुणे येथे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करून हे घवघवीत यश संपादन केले आहे.
वैभव चे प्राथमिक शिक्षण अमरावती येथे तर माध्यमिक शिक्षण बीड येथील चंपावती येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण अहिल्यानगर येथील रेसिडेन्सी काॅलेज मध्ये झाले तर उच्च शिक्षण एमआयटी काॅलेज पुणे येथे झाले तेथे आयटी मध्ये पदवी मिळवली.
पदवी परीक्षेचा अभ्यास करत असताना स्पर्धा परिक्षेची तयारी २०१९ पासून सुरू केली. पुणे येथेच स्पर्धा परिक्षेचा अभ्यास केला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २०२३ मध्ये ३७४ जागा साठी जाहिरात आलेली होती. या परीक्षेचा काल निकाल लागला यात वैभवची ओबीसी मध्ये ३३ वी रँक आहे.
वैभव च्या घवघवीत यशाबद्दल साकत, सावरगाव, जामखेड, बीड परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लवकरच साकत येथे भव्य मिरवणूक व भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.