जामखेड न्युज – – – –
टोकियो ऑलिम्पिकमधून भारतासाठी आनंदाची बातमी आली आहे. टीम इंडियाची प्रसिद्ध बॅडमिंटनपटूने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. पी व्ही सिंधूने क्वार्टरफायनलमध्ये जपानच्या आकणे यामागुचा पराभव केला आहे. सिंधूच्या विजयामुळे भारताच्या आणखी एका मेडलच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
असा झाला सिंधूचा विजय
सिंधूने आपला आक्रमक फॉम कायम राखत टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. तिने क्वार्टरफायनलमध्ये जपानच्या अकाने यामागुचीवर सहज सरशी साधली. सिंधूच्या नव्या शैलीसमो यामागुची निष्प्रभ ठरली. तिने यामागुचीचा २१-१२, २२-२० असे सरळ सेटमध्ये नमवले.
सुवर्णपदकापासून सिंधू दोन पाऊल दूर..
सिंधू आता सुवर्णपदकापासून फक्त दोन पाऊल दूर आहे. सेमीफायनलच्या लढतीत सिंधूसमोर ताई जू यिंग किंवा रत्नाचोक इंतानोन यापैकी एकजण आमनेसामने असेल. या स्पर्धेचा चौथा सेमीफायनल सामना तैवानच्या ताई जू आणि थायलंडच्या इंतानोन यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणारी खेळाडूच पी. व्ही. सिंधूला टक्कर देईल.
बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनही सेमीफायनलमध्ये
भारताची युवा बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने दोन दिवसांपूर्वी कारकीर्दीतील पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केला होता. आज शुक्रवारी महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील रोमहर्षक सेमीफायनल फेरीच्या लढतीत लव्हलिनाने चायनीज तैपईची माजी जगज्जेती निन-चीनवर सरशी साधत मात केली आहे. लव्हलिनाने निन-चीनवर ४-१ ने मात करत ऑलिम्पिकमध्ये भारताचे पदक निश्चित करत सेमीफायनल फेरीत धडत दिली आहे.