महिला दिनीच पोलीसाकडून महिलेवर अत्याचार, समाजाचे रक्षकच बनले भक्षक, पाटोदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

0
2276

जामखेड न्युज——

महिला दिनीच पोलीसाकडून महिलेवर अत्याचार,

समाजाचे रक्षकच बनले भक्षक, पाटोदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

 

 

बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे एक लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. तेथे जागतिक महिला दिनीच पोलीस कर्मचाऱ्याने एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केला आहे.याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. उद्धव गडकर असं आरोपी अंमलदाराचं नाव आहे. तर पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले
आहे.


पोलीस ठाण्यात महिला दिनाचा कार्यक्रम असून तुमचा सत्कार करायचा आहे असे सांगून महिलेला बोलावून घेत घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना शनिवार (ता.८) रोजी शहरात घडली असून या प्रकरणी सबंधित महिलेच्या तक्रारी वरून पाटोदा पोलीस ठाण्यात या कर्मचार्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत दिलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे की, साधारण १५ दिवसापूर्वी तक्रार देण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यात ही २५ वर्षीय महिला आली होती. यावेळी याठिकाणी कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी उद्धव गडकर याने या महिलेला काही गरज लागल्यास फोन करा म्हणून फोन नंबर घेतला आणि नंतर ओळख वाढवली.

यानंतर महिला दिनी शनिवारी सबंधित महिला पुणे ते बीड प्रवास करत असताना गडकर याने तिच्याशी संपर्क करून पोलीस ठाण्यामध्ये महिला दिनाचा कार्यक्रम आहे. त्यानिमित्त आपला सत्कार करण्यात येणार असल्याचे सांगून पाटोदा येथे उतरण्यास सांगितले.


ही महिला पाटोदा शहरात येताच तिला गाडीवर बसवून आपल्या घरी घेऊन जाऊन तिच्यावर अत्यचार केला व याबाबत कुठे वाच्यता केली तर तुला खोट्या चोरीच्या गुन्ह्यात अडकवेल अशी धमकी दिली.

परंतु महिलेने थेट पोलीस ठाणे गाठत गडकर विरोधात तक्रार दिल्यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांनी भेट देऊन या प्रकरणी माहिती घेतली असून या प्रकरणी पोलीस कर्मचारी उद्धव गडकर याला ताब्यात घेत याच्या विरोधात पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

समाजाचे रक्षकच बनले भक्षक

पोलीस हे समाजाचे रक्षण म्हणून काम करतात पण पाटोदा येथे महिला दिनीच महिलेवर पोलीस कर्मचाऱ्याने अत्याचार केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. समाजाचे रक्षकच बनले भक्षक असे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here