जामखेड येथे विविध ठिकाणी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा जामखेड शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करू – नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी
जामखेड येथे विविध ठिकाणी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा
जामखेड शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठीसर्वांनी एकत्रित प्रयत्न करू – नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी
आजही लोकशाहीत सत्यता दाखवण्याचा काम सर्वच माध्यमांचे पत्रकार करत आहेत. लोकप्रतिनिधी व पत्रकार यांच्यात नेहमीच विश्वास व सहकार्याचे नाते राहिलेले. आगामी काळात हे नाते असेच टिकून ठेवून जामखेड शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण हातात हात घालून काम करूया असे प्रतिपादन जामखेड नगर परिषदेच्या प्रथम लोकनियुक्त अध्यक्ष प्रांजल चिंतामणी यांनी केले.
काल दि. ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जामखेड नगर परिषदेच्या वतीने पहिल्यांदाच पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित पत्रकारांचा गुलाब पुष्प पेन व डायरी देऊन येतोच सन्मान करण्यात आला. जामखेड नगर परिषदेच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जामखेड नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, तर भाजपाचे गटनेते तात्याराम पोकळे, नगरसेवक मोहन पवार, ॲड .प्रवीण सानप, पोपट राळेभात, प्रा. विकी घायतडक, हर्षद काळे, श्रीराम डोके, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, प्रवीण होळकर, संतोष गव्हाळे, मनोज कुलकर्णी, अशोक शेळके, अर्जुन म्हेत्रे, सागर टकले, नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक संभाजी कोकाटे, पाणीपुरवठा अभियंता ज्ञानेश्वर मिसाळ, बांधकामा अभियंता अमीर शेख, तसेच कर्मचारी प्रमोद टेकाळे, रज्जाक शेख, महेश कवादे, आतुल कोकाटे, अभिजीत भैसडे, आकाश डोके, कृष्णा वीर, अनिल आरेकर आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी जामखेड तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये पत्रकार अशोक निमोणकर, नासिर पठाण, सुदाम वराट ,वसंत सानप, मिठूलाल नवलाखा, संजय वारभोग, यासीन शेख, ओंकार दळवी, समीर शेख,दत्तात्रेय राऊत, सुदाम वराट, अविनाश बोधले, पप्पूभाई सय्यद, समीर शेख, सचिन आटकरे, अशोक वीर, धनराज पवार,फारुख शेख, अजय अवसरे, सुजीत धनवे, विजय राजकर, , प्रकाश खंडागळे, शंकर कुचेकर, अनिल धोत्रे, निलेश वनारसे, किरण रेडे, शिवाजी इकडे आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक अमित चिंतामणी, नगरसेवक प्रा. विकी घायतडक, पत्रकार दत्तात्रय राऊत, नासिर पठाण आदींसह विविध मान्यवरांकडून आपल्या मनोगताद्वारे उपस्थित पत्रकारांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या शेवटी ऍड. प्रवीण सानप यांनी सर्व उपस्थित त्यांचे आभार मानले.
चौकट पत्रकार हा समाजाचा आरसा आहे : अधक्ष नासीर पठाण
जामखेड नगरपरिषदे तर्फे पत्रकार दिन आयोजित करण्यात आला होता . जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकार बंधुचा सन्मान मोठा उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमातजामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणाले की पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. संघटनेच्या समाजहिताचे उपक्रम जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम पत्रकार – करत असतात. आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण – काळात पत्रकारांची भूमिका अधिक जबाबदार बनली आहे. सत्य, – वस्तुनिष्ठता आणि सामाजिक – बांधिलकी जपत पत्रकार काम करत आहेत.
तसेच पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे . तेव्हा नवनिर्वाचीत नगरध्याक्ष व नगरसेवकांनी पत्रकारांची घरपट्टी व पाणी पट्टी माफ करण्याची मागणी पत्रकार नासीर पठाण यांनी जामखेड नगरपरिषदेकडे केली . या मागणीला नगरध्याक्ष प्रांजलताई चिंतामणी व सर्व नगरसेवकांनी दुजारा दिला.
पत्रकार दिनानिमित्त जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिन साजरा
मराठी पत्रकार सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी देशातील पहिले मराठी वृत्तपत्र काढून इंग्रज सरकारकडून देशातील जनतेवर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत स्वातंत्र्य चळवळीत मोठी कामगिरी केली. त्यावेळी त्यांनी दिलेले योगदान मोठे होते. आजही काळ जरी बदलला असला, तरी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून देशातील पत्रकार, गोरगरीब, वंचित जनतेला न्याय देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे अशा पत्रकारांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. असे प्रतिपादन जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी केले. काल दि ६ जानेवारी रोजी जामखे पोलीस स्टेशनच्या वतीने तालुक्यातील पत्रकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा याही वर्षी पोलीस स्टेशनने पुढे सुरू ठेवली. याबाबत पत्रकारांनी त्यांचे आभार मानले आहेत. जामखेड पोलीस स्टेशन येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी जामखेड तालुक्यातील पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते .
शिवसेना युवा नेते आकाश बाफना यांच्या वतीने पत्रकार दिन साजरा
जामखेड तालुका शिवसेना युवा नेते आकाश बाफना यांच्या वतीने तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. लोकशाहीचा सर्वात मोठा आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकार बंधू व भगिनींना प्रथम पत्रकार दिनाच्या शुभेच्छा शिवसेनेच्या वतीने आकाश बाफना यांनी दिल्या.
जामखेड तालुका शिवसेना तर्फे पत्रकार दिनाच्या व भावी वाटचालीस सर्व पत्रकार बंधूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या यावेळी जामखेड तालुक्याचे शिवसेना युवा नेते आकाश बाफना, युवासेना तालुका प्रमुख प्रवीण बोलभट्ट, जिल्हा उपप्रमुख नितीन कोल्हे, ओबीसी जिल्हाध्यक्ष शिवकुमार डोंगरे, युवा तालुका समन्वयक कुलदीप पवार , युवा नेते नवनाथ पाचरणे तसेच जामखेड तालुका सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते.