जामखेड न्युज——
रयत शिक्षण संस्थेच्या सल्लागार मंडळात विजयसिंह गोलेकर यांची निवड
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांची रयत शिक्षण संस्थांच्या उत्तर विभाग सल्लागार मंडळात निवड करण्यात आली आहे यामुळे त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी, रयत शिक्षण संस्था, उत्तर विभागाच्या विभागीय चेअरमन मा.आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षते खाली सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत विषय क्र. 1 अनुसार विजयसिंह गोलेकर यांची रयत शिक्षणसंस्था, उत्तर विभाग, सल्लागार मंडळावर निमंत्रित सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल विजयसिंह गोलेकर यांच्या वर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
विजयसिंह गोलेकर यांची निवड ही रयत शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणानुसार विविध शाखांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी संस्थेप्रती निष्ठेने काम करून वेळोवेळी सक्रिय सहकार्य व मार्गदर्शन दिले आहे. येथून पुढेही त्यांचे सहकार्य मिळावे ही नम्र विनंती करण्यात आली आहे.
विजयसिंह गोलेकर यांच्या निवडीमुळे रयत शिक्षण संस्थेच्या कार्यात नवीन ऊर्जा व उत्साहाची भर पडण्याची अपेक्षा असून त्यांच्या अनुभवाचा वापर करून संस्था विविध शैक्षणिक विकासाच्या प्रकल्पांना गती देऊ शकेल. यामुळे संस्थेची प्रतिष्ठा आणि कार्यक्षमता वाढण्याची शक्यता आहे.
विजयसिंह गोलेकर यांची उत्तर विभागातील सल्लागार मंडळात निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्थरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.तसेच या निवडीमुळे खर्डा, जामखेड परिसरातून अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.