दहावी उत्तरपत्रिका तपासणीचे मानधन पुणे बोर्डाकडून हडप,
दरवर्षी मानधनाचा फार्म भरूनही मानधन होते गायब
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे चे गेल्या चार पाच वर्षापासून दहावी बोर्ड परीक्षा उत्तरपत्रिका तपासणीचे मानधन शिक्षकांना मिळत नाही. उत्तरपत्रिका जमा करतेवेळी नियमकाकडे सर्व माहिती भरून घेतली जाते, बँक पासबुक झेरॉक्स, खाते क्रमांक, आयएफसी कोड असा फार्म भरून घेतला जातो मग तपासणी मानधन कुठे जाते असा प्रश्न शिक्षकांना पडलेला आहे.
दहावी बोर्ड परीक्षेबाबत पुणे बोर्डाकडून अजब कारभार पाहावयास मिळत आहे. विषय नसणाऱ्या शिक्षकांना पेपर, सेवानिवृत्त शिक्षकांना बाह्य परिक्षक म्हणून काम, तसेच अनेक वर्षापासून पेपर तपासणी मानधन मिळतच नाही यामुळे अनेक शिक्षकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
असे असते मानधन
तीन तासाचा पेपर जुने मानधन प्रति पेपर पाच रूपये नवीन 6.50 पैसे
दोन तास पेपर जुने मानधन तीन रुपये प्रति पेपर नवीन मानधन चार रूपये प्रति पेपर
नियमकास तीन तास पेपर साठी जुने 1.75 पैसे नवीन 2.25 पैसे दोन तास पेपर 1.25 नवीन 1.75 असा दर ठरलेला असताना गेल्या अनेक वर्षांपासून मानधन मिळतच नाही.
चौकट मी गेल्या पाच वर्षापासून पेपर तपासणीचे काम करत आहे. दरवर्षी नियमकाकडे बँक पासबुक झेरॉक्स, सर्व बँक डिटेल्स देऊनही एकदाही मानधन जमा झाले नाही. मात्र फार्म दरवर्षी भरून घेतला जातो मग हे मानधन कोठे जाते. असा प्रश्न पडलेला आहे. अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका परीक्षकाने दिली आहे.