छत्रपती शिवाजी महाराज आजही लोकांच्या ह्दयात – प्रा. मधुकर राळेभात
प्रा. मधुकर राळेभात मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
तत्कालीन धर्म मार्तंडांनी शिवजयंती साजरी करताना वेगवेगळे भेद निर्माण केले. जर जगातील सर्व व्यवहार तारखेनुसार चालतात तर मग महाराजांची जयंती तारखेनुसार का नाही? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देशातील सामान्य माणसाला जगण्याची दिशा दाखवली त्या राज्याची जयंती साजरी करणे अभिमानास्पद आहे. महाराज आजही सर्वांच्या ह्दयात आहेत असे प्रा. मधुकर राळेभात यांनी सांगितले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आज दि. १९ फेब्रुवारी रोजी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशात साजरा होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात भगवेमय वातावरण तयार झाले आहे. याचा अनुषंगाने जामखेड येथील प्रा. मधुकर राळेभात मित्र मंडळाच्या वतीने शहरातील आर. एन. ज्वेलर्स या भव्य दालना समोरच्या प्रांगणात संपन्न झालेल्या कार्यक्रमादरम्यान प्रा मधुकर राळेभात बोलत होते.
पुढे बोलताना राळेभात म्हणाले की जगातील सर्व सैनिक दलात महाराजांच्या युद्धनीतीचा वापर केला जात आहे. जग महाराजांना आदर्श मानते. एखाद्या माणसाला मोठे ध्येय गाठायचे असेल तर वेगवेगळ्या नीतीचा वापर केला पाहिजे. महाराजांनी त्यांच्या काळात सर्व जाती धर्माच्या माणसांना एकत्र केले होते जर. महाराजांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. आपण त्यापैकी एका पैलूनुसार जीवन जगलो तर आपले जीवन कितीही उंचीपर्यंत जाऊ शकते.
पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले की शिवरायांचे विचार तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचतील आसे काम करणे ही काळाची गरज बनली आहे. महिला. सर्वसामान्य नागरिक यांना न्याय देण्याचा महाराजांचा दृष्टिकोन ४०० वर्षापूर्वीच होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानत होते. चारशे वर्षांपूर्वी सर्व जाती-धर्मांना घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्याच दृष्टिकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना लिहीलेली आहे.
यावेळी जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, ॲड. अरूण जाधव, अजहर काझी, ॲड. शमा हाजी कादर, संजय काशिद, प्रा. जाकीर शेख, प्रा. विकी घायतडक, गोकुळ गायकवाड, ॲड. महारूद्र नागरगोजे या मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.
यावेळी बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले, माजी नगरसेवक मोहन पवार, त्रिदल आजी-माजी सैनिक संघाचे अध्यक्ष व शिवनेरी अकॅडमीचे संचालक सेवानिवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे, राष्ट्रीय काँग्रेसचे युवक प्रदेश सरचिटणीस राहुल उगले, साहित्यिक गोकुळ गायकवाड, जामखेड पाॅलिटेक्निकल काॅलेजचे प्रिन्सिपल विकी घायतडक, प्रा. लक्ष्मण ढेपे, ॲड. शमा हाजी कादर, बापूसाहेब ओहोळ, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, भाजपा शहराध्यक्ष पवन राळेभात, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष नय्युम सुभेदार, दिगंबर चव्हाण, गुलाब जांभळे, मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष अजहर काझी, माजी ग्रामपंचायत सदस्य ईस्माईल सय्यद, मुक्तार सय्यद, अमित जाधव, मोईज शेख, प्रकाश सदाफुले, अर्जुन लोंढे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरूण जाधव, मनसे तालुकाप्रमुख प्रदिप टापरे सह आदि मान्यवरांसह ग्रामस्थ व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.