न्यु इंग्लिश राजुरी येथे शिवजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात साजरे

0
247

जामखेड न्युज——

न्यु इंग्लिश राजुरी येथे शिवजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात साजरे

 

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या न्यु इंग्लिश राजुरी येथे शिवजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांसह विद्यार्थी व सर्व शिक्षक हजर होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आश्रुबा फुंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष घुले, पोलीस पाटील दत्तात्रय मोरे, शहाजी राळेभात, सरपंच सौ .अश्विनीताई सागर कोल्हे, भाऊसाहेब काळदाते अध्यक्ष शिक्षक पालक संघ, श्री. बाळासाहेब माने उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, श्री. दौंड महाराज ज्ञानवैकल्य वारकरी संस्था राजुरी, श्री.राम शेठ कोल्हे, पालक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले.


यावेळी अध्यक्षीय भाषणात फुंदे यांनी सांगितले की, परश्री माते समान माना हे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवचन सांगून विद्यार्थ्यांची मने जिंकली.

सुभाष घुले यांनी आधी लग्न कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे असे सांगत छत्रपतींचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवला.

मुख्याध्यापक रमेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना छत्रपतींचा इतिहास आचरणात आणा असे उदबोधन केले.

श्री दौंड महाराज यांनी कोणत्या वयात कोणत्या कृती कराव्यात हे विचार दृष्टांतासह विद्यार्थ्यांसमोर मांडले.

कार्यक्रमात विशेष आकर्षण होते ते म्हणजे छत्रपती शिवरायांच्या जन्माचा पाळणा हे गीत. झुलवा पाळणा इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थ्यांनी हे गीत उत्तम सादर केले गीताचे नृत्यदिग्दर्शन केले होते विजय क्षीरसागर यांनी. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता पिसाळ यांनी केले. तर आभार गौतम हुलगुंडे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी विद्यालयातील अध्यापक सुभाष बोराटे, विजय क्षीरसागर, गौतम हुलगुंडे, अक्षय मोहिते या सर्वांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here