इतिहास घडविण्यासाठी इतिहासाचे स्मरण आवश्यक – डॉ. संजय राऊत जामखेड तालुका डॉक्टर संघटना (JTMPA) तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

0
401

जामखेड न्युज——

इतिहास घडविण्यासाठी इतिहासाचे स्मरण आवश्यक – डॉ. संजय राऊत

जामखेड तालुका डॉक्टर संघटना (JTMPA) तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

नवीन इतिहास घडवायचा असेल घडलेल्या इतिहासाचे स्मरण करणे आवश्यक आहे आपल्या प्रेरणास्थानांचं स्फूर्तीस्थानांचं नव्याने अवलोकन करून सत्य जे आहे ते पुढील पिढीला सांगणे गरजेचे आहे असे प्रतिपादन अध्यक्ष डॉक्टर संजय राऊत यांनी केले. 

 

जामखेड तालुका डॉक्टर संघटना (JTMPA) तर्फे शिवजयंती थाटामाटात साजरी आज शिवजयंती निमित्त तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील सर्व डॉक्टर्स एकत्र येऊन मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.

आजच्या शिवजयंतीचे वैशिष्ट्य म्हणजे महिला डॉक्टर्स यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प पूजन करून, दीपप्रजल्वित करून, फुलांची उधळण करून, शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.

संघटनेच्या उपाध्यक्ष डॉ सौ मनीषा राळेभात, प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ सौ पल्लवी सूर्यवंशी, सोनोग्राफी तज्ञ डॉक्टर चंद्रकांत मोरे, जामखेडचे प्रथम स्त्री रोग तज्ञ डॉक्टर महेश घोडके, माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश पवार यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉक्टर पांडुरंग सानप यांनी केले या कार्यक्रमास संघटनेचे ज्येष्ठ सदस्य डॉ आर एम पवार, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर गणेश झगडे, अस्थिरोग तज्ञ डॉ. चकोर, बालरोगतज्ञ डॉ. सुहास सूर्यवंशी, डॉ राजकुमार सानप, डॉ. प्रशांत शहाणे, डॉ. प्रवीण मिसाळ, डॉ. प्रदीप कुडके, डॉ. बाळासाहेब मुळीक, स्त्री रोग तज्ञ डॉ. अर्चना झगडे, डॉ.भारती मोरे, डॉ. विद्या काशीद, सौ संगीता सानप, सौ सविता राऊत, सौ गायकवाड मॅडम इ .सदस्य उपस्थित होते.


हा कार्यक्रम घेण्यास डॉ. सुरेश काशीद डॉ. जतिन काजळे डॉ. अशोक बांगर डॉ. अनिल गायकवाड डॉ तानाजी राळेभात यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here