कर्जत, जामखेड तालुक्यातील जलसंधारण कामाला गती द्यावी- सभापती प्रा. राम शिंदे जवळा-बारव साठवण तलाव निविदा महिनाअखेर पुर्ण करा

0
292

जामखेड न्युज——

कर्जत, जामखेड तालुक्यातील जलसंधारण कामाला गती द्यावी- सभापती प्रा. राम शिंदे

जवळा-बारव साठवण तलाव निविदा महिनाअखेर पुर्ण करा

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड तालुक्यात सुरू असणारे जलसंधारणाची कामे येत्या मार्च अखेर पूर्ण करून कामाला गती द्यावी, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

विधानभवनात अहिल्यानगर येथील कर्जत व जामखेड तालुक्यातील जलसंधारण मंजूर व पूर्ण झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सभापती प्रा. राम शिंदे बोलत होते.

यावेळी मृद व जलसंधारण विभाग नाशिकचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते, पुण्याचे मुख्य अभियंता एस.पी.कुशिरे, जामखेडचे उप विभागीय जलसंधारण अधिकारी पी. एन. शिंदे, पारनेरचे जलसंधारण अधिकारी वाय. ए. अबिलवादे उपस्थित होते.

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, जामखेड तालुक्यातील जवळा-बारव येथील साठवण तलाव योजनेची निविदा प्रक्रिया २८ फेब्रुवारी अखेर पूर्ण करावी. कर्जत तालुक्यातील येथील कामाचाही आढावा घेतला.

तसेच यावेळी एकूण १५१ कामांपैकी पूर्ण ६० आणि अन्य प्रगतीपथावरील ४५ कामांबाबत आणि जलसंधारण मंडळ, जलयुक्त शिवार अभियान 2.0, अटल भूजल योजना, मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना, धरण व गाळमुक्त शिवार योजना आदी बाबींचा आढावा घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here