मधुकाका देशमुख राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पुण्याच्या साईराज घाटपांडे ने पटकावला प्रथम क्रमांक जामखेड महाविद्यालयात राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन वकृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

0
372

जामखेड न्युज——

मधुकाका देशमुख राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पुण्याच्या साईराज घाटपांडे ने पटकावला प्रथम क्रमांक

जामखेड महाविद्यालयात राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन वकृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

जामखेड येथे गेल्या तेरा वर्षापासून सुरू असलेल्या स्वातंत्र्यसैनिक कै. मधुकाका देशमुख स्मृती प्रित्यर्थ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पुणे येथील साईराज घाटपांडे यांने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक नागपूर येथील अनिकेत वनारे तर तृतीय क्रमांक पनवेल येथील पंकज पांडुळे पटकावला विविध मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आले.


जामखेड महाविद्यालय, जामखेड आणि
ल.ना. होशिंग माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड आयोजित स्वातंत्र्यसैनिक कै. मधुकाका देशमुख स्मृती प्रित्यर्थ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ सोहळ्याचे अध्यक्ष मा. श्री अजयकुमार लोळगे (बालभारती विशेष अधिकारी पुणे)प्राचार्य डॉ. डोंगरे एम. एल कला शाखाप्रमुख प्रा. फलके ए.बी, श्री. उमेश देशमुख, धनराज पवार, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, स्पर्धक , विद्यार्थी उपस्थित होते.

निकालाचे वाचन प्रा. फलके ए.बी यांनी केले. स्पर्धाचा निकाल पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक कु. साईराज मोहन घाटपांडे, नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय पुणे,
व्दितीय क्रमांक कु.अनिकेत रामा वनारे , संताजी महाविद्यालय नागपूर, तृतीय क्रमांक कु. पंकज पंढरीनाथ पांडुळे महात्मा फुले ए. एस‌. सी कॉलेज पनवेल,


उत्तेजनार्थ १ कु.महेश जनार्दन उशीर न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर उत्तेजनार्थ २ कु.अक्षता विनायक किंबहुणे जामखेड महाविद्यालय जामखेड, वरील स्पर्धक विजेते ठरले, मा.श्री अजय कुमार लोळगे व प्राचार्य डॉ. डोंगरे एम.एल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रधान करण्यात आले.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. तनपुरे एस .डी , प्रा. घोगरदरे टी.ए यांनी केले. आभार प्रा.फलके ए.बी यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भाकरे आर.ए यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here