जामखेड न्युज——
पुणे येथे पार पडलेल्या पहिल्या आशियान तायक्वांन स्पर्धेत जामखेडच्या पाच खेळाडूंना सुवर्णपदक
पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या आशियान तायक्वांन (1st Asian Taekkyeon ) या स्पर्धेमध्ये आयडियल स्पोर्ट अकॅडमीच्या पाच खेळाडूंनी पाच तर गटामध्ये मध्ये चार सुवर्णपदक असे नऊ सुवर्णपदक मिळवत तायक्वांन स्पर्धेत आपला दबदबा सिद्ध केला आहे.
पुणे बालेवाडी येथे पार पडलेल्या पहिल्या आशियान तायक्वांन स्पर्धेत श्रेयश वराट, योगेश वाघमोडे, सोहेल शेख, मयुर शिरगिरे, रोहन धोत्रे या पाच खेळाडूंनी सुवर्णपदक मिळवले आहे. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सर्व खेळाडू नवीन मराठी शाळा,जामखेड येथे मुख्य मार्गदर्शक व आंतरराष्ट्रीय खेळाडू लक्ष्मण उदमले व उपाध्यक्ष शाम पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाचा सराव करत आहे.
सर्व खेळाडूंचे, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे, कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार, मा. जि. प.सदस्य प्रा.मधुकर राळेभात, उमेश देशमुख,
मा. प्राचार्य श्रीकांत होशिंग, प्राचार्य बी. के. मडके, बी. ए. पारखे, संजय काशिद, आबा जायगुडे, रोहित थोरात, विशाल धोत्रे, सुरेश राऊत, मयुर भोसले, जामखेड तालुक्यातील पत्रकार यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.