कर्जत तालुक्यात प्रथमच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा – राजेंद्र फाळके व काकासाहेब तापकीर यांचे आवाहन

0
750

जामखेड न्युज——

कर्जत तालुक्यात प्रथमच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन

कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांचे आवाहन

कर्जत तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी बंधू आणि भगिनी यांच्या साठी कर्जत तालुक्यातील सदगुरू ग्राम विकास प्रतिष्ठान, कर्जत व कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जत यांच्या वतीने राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन दि. ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान कर्जत शहरात फाळके पेट्रोल पंपा शेजारील मैदानावर आयोजित करण्यात आले आहे .

कृषी प्रदर्शन म्हणजे शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन पद्धतींची माहिती देणारे कार्यक्रम. या प्रदर्शनांमध्ये शेतकऱ्यांना पारंपारिक आणि अत्याधुनिक शेतीच्या पद्धतींची माहिती मिळते. कृषी प्रदर्शनांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरणीय शेती, शाश्वत शेती यांसारख्या विषयांवर चर्चा केली जाते.

तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी बंधू व भगिनी सह नव उद्योजक,व्यावसायिक, नोकरदार व खवय्ये यांना या प्रदर्शनाचा लाभ मिळणार आहे .


या कृषी प्रदर्शना मध्ये नवनवीन तंत्रज्ञान, अवजारे, ट्रॅक्टर्स ,ठिबक सिंचन, सोलर,खते बी बियाणे, पशुसंवर्धन व पशुआहार सह शेती विषयक सर्व काही एकाच ठिकाणी पाहता येणार असून महिलांसाठी घरगुती उद्योगाची माहितीही उपलब्ध होणार आहे.

या कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण एक कोटी किमतीची भारतातील प्रसिद्ध , अनेक पुरस्कार प्राप्त कर्नाटक येथील ” रेडा जोडी ” असणार आहे .
तसेच महिलांसाठी गृहोपयोगी वस्तुंचे अनेक स्टॅाल्स या ठिकाणी असणार आहेत.

तसेच खवय्या साठी कोल्हापुरी पांढरा-तांबडा रस्सा व निरनिराळ्या खुप सा-या पदार्थाची चव घ्यायला मिळणार आहे.

हे कृषी प्रदर्शन सर्वांसाठी मोफत आहे. या कृषी प्रदर्शनाचे आयोजन सदगुरू ग्राम विकास प्रतिष्ठान कर्जत व कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जत यांनी केले आहे.

कर्जत तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक व खवय्ये यांनी या प्रदर्शनाला आवश्य भेट द्यावी व लाभ घ्यावा हि विनंती सदगुरू ग्राम विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांनी केले आहे.

चौकट

कृषी प्रदर्शन म्हणजे शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन पद्धतींची माहिती देणारे कार्यक्रम. या प्रदर्शनांमध्ये शेतकऱ्यांना पारंपारिक आणि अत्याधुनिक शेतीच्या पद्धतींची माहिती मिळणार आहे. कृषी प्रदर्शनांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरणीय शेती, शाश्वत शेती यांसारख्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. तेव्हा परिसरातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

राजेंद्र फाळके व काकासाहेब तापकीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here