अवयवदान संकल्प अभियानांतर्गत जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड मरणोत्तर देहदानाच्या पाचशेच्या उंबरठ्यावर
जैन कॉन्फरन्स व कोठारी प्रतिष्ठान जामखेड च्या वतीने राबवण्यात येणाऱ्या देहदान अवयवदान प्रक्रीयेस दिवसे दिवस उत्तम प्रतिसाद मिळत असून आता दि २१ जानेवारी रोजी एकाच वेळी भाऊराव कोंडीराम साळवे राशीन ता कर्जत वय ९२ वर्ष नानासाहेब गणपत शिंदे रा नागमठाण ता कर्जत वय ५७ वर्ष कल्याण तुकाराम शिंदे रा वडगाव ता करमाळा वय वर्ष ४९ या तीन वृद्धांनी आपला मरणोत्तर देहदानाचा संकल्प करत आपले मरणोत्तर देहदानाचे फॉर्म दाखल केले आहेत. विशेष म्हणजे वरील हे देहदान संकल्प करणारे तिघेजण एक वृद्धाश्रम चालवत आहेत आज जामखेड शहरातील कोठारी प्रतिष्ठानच्या ऑफिसमध्ये येऊन स्वतःचा मरणोत्तर संकल्प आवयव दान अभियाना अंतर्गत आपले फॉर्म भरले आहेत.
दरम्यान घेण्यात आलेल्या छोटे खानी कार्यक्रमातर बोलताना नानासाहेब शिंदे म्हणाले मी माझी सरपंच असून मी प्रत्येक समाजकार्यात पुढे असतो समाधान मिळते आज आम्ही सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या कोठारी प्रतिष्ठानच्या ऑफिसमध्ये येऊन देहदान अभियानाचा फॉर्म भरलेला आहे आम्हाला बऱ्याच वेळा माहिती मिळाली होती मी माझ्या घरच्यांची परवानगी घेऊन आज हा फॉर्म भरलेला आहे माझ्या देहा पासुन अनेक डॉक्टर शिकतील यात मला आनंद आहे त्यांच्यापासून हजारोंचे प्राण वाचतील.
यावेळी बोलताना कल्याण शिंदे म्हणाले मी शेतकरी असून मी अपंग आहे मला या दोघांनी देहदानाचे महत्त्व पटवून सांगितले मी लगेच तयार झालो आणि आज संजय कोठारी यांच्याकडे फॉर्म भरलेला आहे.
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी गेल्या बऱ्याच वर्षापासून सामाजिक कार्यकरत असून आम्ही गेल्या काही वर्षापासून देहदान, डोळे दान त्यांच्या कार्याची माहिती ऐकून आहे.
श्री आज आम्ही तिघांनी सामाजिक कार्य संजय कोठारी यांच्याकडे येऊन देहदांन संकल्प अभियानात आम्हाला संपूर्ण माहिती वर्तमानपत्रात वाचली असून आम्ही घरच्यांच्या परवानगीने संजय कोठारी यांच्याकडे जाऊन फॉर्म भरण्याचा निश्चय केला आज मंगळवार दि.२१/१/२०२५ रोजी सकाळी आठ वाजता आम्ही त्यांच्या ऑफिसला येऊन स्वखुशीने फॉर्म भरलेला आहे आमच्या देहाची जाळून राख होण्यापेक्षा आमच्या देहापासून अनेक डॉक्टर होतील आणि ते हजारो लोकांचे प्राण वाचवतील यामुळे आम्ही निश्चय घेतला आहे तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे कार्य जवळून पाहिले खूप आनंद वाटला यावेळी बोलताना भाऊराव साळवे म्हणाले मी आज सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्याकडे येऊन आपला आवयव दान चा फॉर्म भरलेला आहे.
त्यांचे सामाजिक कार्य खूप उल्लेखनीय आहे अपघातातील लोकांना वाचवायचे काम त्यांनी बऱ्याच वर्षापासून चालू ठेवले आहे. तसेच त्यांनी कोरोना काळात लोकांना खूप मदत केली आहे माझ्या देहापासून पासून अनेक डॉक्टर बनतील आणि अनेकांचे प्राण वाचवतील माणूस मेल्यानंतर त्याची राख होण्यापेक्षा आपला देह कोणाचे तरी कामाला यावा या उद्देशानेआम्ही आज जैन कॉन्फरन्स आणि कोठारी प्रतिष्ठान यांच्या ऑफिसला येऊन स्वखुशीने फॉर्म भरत आहे
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले आत्तापर्यंत आम्ही ४९१ लोकांचे मरणोत्तर दे दान फॉर्म भरून घेतले आहेत यातील 20 जणांचे अवयव दान डोळेदान केलेले आहे या कामात डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन चे चेअरमन व राज्याचे जलसंधारण मंत्री माननीय डॉ राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील संस्थेचे मेडिकल डायरेक्टर आदरणीय डॉ.अभिजीत दिवटे सर मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता आदरणीय डॉ. सुनील म्हस्के सर,मेडिकल कॉलेज शरीर रचना विभागप्रमुख डॉ.सुधीर पवार यांचे सहकार्य लाभले