हेल्थ इन्शुरन्स जीवनाची गरज – डॉ. संजय भोरे सनराईज मेडिकल & एज्युकेशन फौंडेशन च्या कर्मचाऱ्यांसाठी टर्म अँड हेल्थ इन्शुरन्स च्या सेमिनार चे आयोजन

0
339

जामखेड न्युज——

हेल्थ इन्शुरन्स जीवनाची गरज – डॉ. संजय भोरे

सनराईज मेडिकल & एज्युकेशन फौंडेशन च्या कर्मचाऱ्यांसाठी टर्म अँड हेल्थ इन्शुरन्स च्या सेमिनार चे आयोजन

कुटुंब हे एक वरदान आहे आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आनंदी कुटुंब त्याचे प्रेम उत्तम आरोग्य बनले असते त्यासाठी आरोग्य ही आपली खरी संपत्ती आहे संपूर्ण आयुष्यात हेल्थ इन्शुरन्स आपल्या जीवनाची गरज बनलेली आहे निरोगी राहण्या इतकीच महत्त्वाचे आहे मेडिकल अर्जन्सीच्या वेळी हेल्थ इन्शुरन्स हे आपल्याला साथ देतात परंतु आपल्याकडे पूर्व नियोजन नसेल तर आपल्या वरती मोठे संकट येऊ शकते आज वैद्यकीय खर्च मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे प्रत्येक कुटुंबासाठी मेडिक्लेम पॉलिसी गरजेची आहे तरच आपले कुटुंब सुरक्षित असणार असे मत सनराईज् मेडिकल अँड एज्युकेशन फौंउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ संजयजी भोरे यांनी व्यक्त केले.

सनराईज मेडिकल & एज्युकेशन फौंडेशन च्या कर्मचाऱ्यांसाठी टर्म अँड हेल्थ इन्शुरन्स च्या सेमिनार चे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सनराईज् मेडिकल अँड एज्युकेशन फौंउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ संजयजी भोरे साहेब हे होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, आज भारत देशात अनेक मोठ मोठे आजाराने आपल्याला जखडलेले आहे त्यामध्ये, हार्ट अटॅक, ब्रेन अटॅक किडनी फेल्युअर, स्ट्रोक, कॅन्सर, पॅरालेसिस , फुफ्फुसाचा आजार, ब्रेन ट्यूमर, एनसीफ्लायटिस, ब्रेन सर्जरी, रक्तदाब, कर्करोग, मुळव्याध, मधुमेह , कोरोना, कर्करोग असे अनेक आजार ज्याचा खर्च सर्वसामान्यांना पेलवत नाही त्यासाठी एक आधार म्हणून हेल्थ अँड टर्म इन्शुरन्स मध्ये गुंतवणूक केली पाहिजे.

या वेळी साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय,स्व.एम.ई भोरे जुनिअर कॉलेज च्या प्राचार्या सौ अस्मिता जोगदंड/भोरे मॅडम संस्थेचे संचालक प्रा.तेजस दादा भोरे मंचावर उपस्थित होते.

या वेळी स्टार हेल्थ इन्शुरन्स चे ऍडव्हायजर गोविंद मोरे यांनी स्टार हेल्थ ही भारतातील पहिली स्वतंत्र विमा कंपनी आहे की ज्या कंपनीकडे ११००० पेक्षा जास्त रुग्णालयाचे नेटवर्क पसरलेले आहे विमाधारक यांना कॅशलेस सुविधा पुरवण्यास अग्रेसर आहे कोविड काळामध्ये तीन कोटी पेक्षा जास्त रक्कम कंपनीने पुरवलेली होती हेल्थ/टर्म इन्शुरन्स यातील सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली ४४२६ रुपये च्या प्लॅनमध्ये आपल्याला ५० लाख ची असिसिडेन्टल रिस्क कव्हर मिळते वर तसेच मेडिकल हेल्थ चे विविध प्लॅन सांगितले, या कार्यक्रमाच्या वेळी शिक्षकांच्या शंकाचे निरसन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सुनील घाडगे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.दादासाहेब मोहिते सर यांनी मानले. या कार्यक्रमास सनराईज मेडिकल अँड एज्युकेशन फौंउंडेशन संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या अस्मिता जोगदंड ( भोंरे ) संचालक प्रा.तेजस दादा भोरे काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव चे मुख्याध्यापक विजय मनेरे, सुनील पठाडे, अब्दुल्ले, स्वाती काळे,साधना दंडवते, हनुमंत पाटील, रामभाऊ टिळेकर, अण्णा महानवर, साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय,स्व.एम.ई भोरे जूनियर कॉलेज पाडळी च्या प्राचार्या अस्मिता जोगदंड/भोरे मॅडम, सुषमा भोंरे मॅडम, चंद्रकांत सातपुते,महेश पाटील,दिनकर सरगर,हनुमंत वाघमारे,बुवासाहेब दहीकर, सनराईज इंग्लिश स्कूलचे प्रिन्सिपल अमर भैसडे,बिभीषण भोरे,सुरज वाघमारे,जयश्री कदम,हर्षा पवार,सानिया सय्यद,वैष्णवी तनपुरे, साक्षी नंदिरे,जयश्री साप्ते,दीपक दहीकर
स्व.एम.ई भोरे ज्युनिअर कॉलेजचे प्रा.विनोद बहीर, प्रा.प्रदीप भोडावे,प्रा.स्वाती पवार, दादासाहेब मोहिते, सुनील घाडगे ,प्रा.छबिलाल गावित, प्रा. विवेक सातपुते सह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here