जामखेड न्युज – – –
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज (बुधवारी) कऱ्हाड, पाटणच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ते पूरग्रस्त व भूस्खलनग्रस्त गावांना भेट देणार आहेत, तर कऱ्हाड-पाटण तालुक्यात निर्माण झालेली पूरस्थिती व भूस्खलन भागाच्या पाहणीसाठी आमदार रोहित पवार हे देखील दौऱ्यावर येत आहेत.
देवेंद्र फडणवीस हे कोयनानगर येथील स्थलांतरित केलेल्या कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांना धीर देणार आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी दिली आहे. श्री. फडणवीस यांचे दुपारी एक वाजता मोटारीने कृष्णा अभिमत विद्यापीठ कऱ्हाड येथे आगमन होणार आहे. तेथून मोटारीने ते दुपारी पावणेतीन वाजता आंबेघर- मोरगिरी येथे जाऊन तेथील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. तेथून दुपारी सव्वातीन वाजता ते कोयनानगरकडे जातील. कोयनानगर येथील प्राथमिक शाळेत स्थलांतरित केलेल्या कुटुंबीयांना भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. सायंकाळी पाच वाजता ते पाटण तालुक्यातील हुंबरळी येथे जाऊन अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी करणार आहेत. तेथून ते पुन्हा कऱ्हाडला येऊन कृष्णा अभिमत विद्यापीठ येथे मुक्कामी थांबणार आहेत.
कऱ्हाड, पाटण तालुक्यात निर्माण झालेली पूरस्थिती व भूस्खलन भागाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार हे देखील आज दौऱ्यावर येत आहेत. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नागरिकांना मदत करण्यासह त्यांचे दुःख हलकं करण्यासाठी आमदार पवार आज दौऱ्यावर येणार आहेत. आज सकाळी ते कऱ्हाड पाटणसहित चिपळूणला भेट देणार आहेत. आमदार पवार गुरूवारी कोल्हापूर व सांगलीचा दौरा करणार असून गुरूवारी सायंकाळी ते वाई येथे भेट देवून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधणार