जामखेड न्युज——
स्नेहल भोसलेने जामखेड महाविद्यालयाची प्रतिष्ठा वाढवली – शशिकांत देशमुख
स्नेहल भोसलेची खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड
एलएनसीटी विद्यापीठ भोपाळ येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाला रौप्यपदक व पिरॅमिड प्रकारात कांस्य पदक मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचललेल्या स्नेहल भोसले हिची खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामुळे जामखेड महाविद्यालयाची प्रतिष्ठा वाढली आहे असे मत दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
नुकत्याच एल एन सी टी विद्यापीठ भोपाळ येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ All India Inter University (राष्ट्रीय) मल्लखांब स्पर्धेत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाला रौप्यपदक व पिरॅमिड प्रकारात कास्यपदक मिळवून देण्यास हातभार लावणारी जामखेड महाविद्यालयाची खेळाडूं कु.स्नेहल दत्तात्रय भोसले हिची एप्रिल मध्ये होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
झाल्याबद्दल दि. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख यांनी स्नेहल भोसले हिचा महाविद्यालयात सन्मान केला व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एल. डोंगरे, डॉ. गोलेकर, डॉ. केळकर, प्रा. देशपांडे, क्रीडा संचालक प्रा. डॉ. आण्णा मोहिते प्रा. पवार, डॉ जाधव प्रा. गायकवाड प्रा. पठाण व सर्व कार्यलयीन कर्मचारी उपस्थित होते.
खेलो इंडिया स्पर्धेसाठी भारतातील टॉप 8 संघाचा समावेश केला जातो या मध्ये पुणे विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व करण्यास जामखेड महाविद्यालयातील स्नेहल भोसले हिची निवड ही जामखेड महाविद्यालयासाठी अभिमानास्पद बाब आहे असे सचिव शशिकांत देशमुख यांनी मत व्यक्त केले. निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष उद्धव देशमुख, उपध्यक्ष अरुण चिंतामणी, खजिनदार राजेश मोरे तसेच सर्व संचालक मंडळाने स्नेहल भोसले चे अभिनंदन केले.