रूपेश लहाने यांचे अल्पशा आजाराने निधन, साकत परिसरात शोककळा
साकत येथील रूपेश महादेव लहाने वय 32 यांचे अल्पशा आजाराने आज गुरूवार सकाळी सात वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यामुळे साकत परिसरात शोककळा पसरली आहे. दुपारी बारा वाजता शोकाकुल वातावरणात लहाने वस्ती येथे दु खद वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
रुपेश लहाने हा काही दिवसांपासून आजारी होता. आज सकाळी सात वाजता राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रूपेशचे शिक्षण एमएस्सी झाले होते काही दिवस तो हैदराबाद येथे कंपनी मध्ये नोकरी करत होता सहा महिन्यांपासून तो आजारी असल्याने साकत येथे होता.
ल. ना. होशिंग विद्यालयातील शिक्षक भरत लहाने यांचा तो पुतण्या होता. रूपेश याच्या मागे आई वडील एक भाऊ दोन चुलते चुलत भाऊ बहिण असा मोठा परिवार आहे.