मकरसंक्रांत सणानिमित्त माजी उपसभापती अंकुश ढवळे यांनी केले तिळगूळ व गुळाची ढेप वाटप,
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे पहिले मानकरी
मकरसंक्रांत सणानिमित्त मागीलवर्षीप्रमाणे यावर्षी जवळा जिल्हा परिषद गटातील नागरिकांना तिळगूळ व गुळाची ढेप वाटण्याचा कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुशराव ढवळे यांनी चार दिवसापासून सुरू केले आहे. भारतीय जनता पक्षाचे सदस्य अभियान नोंदणी कार्यक्रमात या उपक्रमाची सुरुवात विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना देऊन करण्यात आले.त्यांच्या या उपक्रमाचे पिंपरखेड पंचक्रोशीतून स्वागत केले जात आहे.
बाजार समितीचे संचालक अंकुशराव ढवळे जवळा जिल्हा परिषद गटात सामाजिक उपक्रम राबवत आहे. मागील वर्षी वारंवार होणारा खंडीत विजपुरवठा व कमी दाबामुळे रोहीत्र जळण्याचे प्रमाण वाढले होते.
त्यावेळी ढवळे यांनी तत्कालीन महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सदर बाब लक्षात आणून दिली व त्यांनी तात्काळ अठरा ते वीस गावात रोहीत्र मंजूर करून महावितरण मार्फत बसवण्याचे काम केले. सर्वरोग निदान शिबीर, रक्तदान असे अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले आहेत.
भारतीय जनता पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते दि. ५ पासुन सुरु करण्यात आले.
याचवेळी सदस्य नोंदणी कार्यक्रमाबरोबरच तिळगूळ व गुळाची ढेप वाटप कार्यक्रम अंकुशराव ढवळे यांनी घेऊन सर्वप्रथम राम शिंदे यांना गुळाची ढेप व तिळगूळ देऊन सुरवात करण्यात आली. तेव्हापासून दररोज सकाळ पासून ढवळे यांचा गावोगाव सदर कार्यक्रम संक्रांत सणापर्यंत चालू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.