बीड प्रकरणी राज्यपाल हस्तक्षेप करणार: सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीनंतर दिले आश्वासन; मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची शिष्टमंडळाकडून मागणी

0
1009

जामखेड न्युज——

बीड प्रकरणी राज्यपाल हस्तक्षेप करणार:
सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीनंतर दिले आश्वासन;
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची शिष्टमंडळाकडून मागणी

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हस्तक्षेप करणार आहेत. या संदर्भात सर्व पक्षीय नेत्यांच्या वतीने राज्यपालांची भेट घेत त्यांना निवेदन देण्यात आले होते. यावर राज्यपालांनी आपण यासंदर्भात हस्तक्षेप करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळानं आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली.

सरपंच संतोष देशमुख प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. आज सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

माजी खासदार संभाजीराजे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार बजरंग सोनावणे, आमदार संदीप क्षीरसागर, ज्योती मेटे यांनी राज्यपालांची भेट घेतली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आज सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती यांनी म्हटलं, ” आधीच उशीर झाला आहे. या प्रकरणात मुळात महाराष्ट्राला न्याय द्यायचा आहे. हे प्रकरण जातपात आणि राजकारणाच्या पलीकडचं आहे. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या होऊनही योग्य न्याय मिळाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा घटना घडणार आहेत. त्यामुळे आम्ही राज्यपालांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे”.
राष्ट्रवादीचे आमदार जिंतेद्र आव्हाड म्हणाले, ” मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा. वाल्मिक कराडला 302 मध्ये आरोपी करावे. गुन्हेगारीचं उदात्तीकरण करू नाही. आम्ही घटनात्मक पद्धतीनं धनंजय मुंडेचा राजीनामा मागत आहोत. बीडमध्ये यापूर्वीदेखील गुन्हे घडले आहेत. त्या प्रकरणांची चौकशी व्हावी. तिसऱ्या फरार आरोपीला अटक व्हावी”. “बीड प्रकरणाला जातीय रंग देऊन नये,” असेही आमदार आव्हाड यांनी म्हटलं/
शिवसेनेचे (यूबीटी) आमदार अंबादास दानवे म्हणाले, ” सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्यादेखील गंभीर आहे. सरकार मुंडे आणि कराडला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. एसआयटीमधील चौकशी अधिकारी आरोपींच्या जवळचे आहेत. सरकार ऐकत नाही म्हणून राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी सविस्तर मागणी ऐकली आहे”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here