जामखेड न्युज——
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जामखेड मध्ये हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
आजची तरुण पिढी व्यसनाधीन न होता चांगले संस्कारक्षम होणे आवश्यक आहे. त्यासाठी तालुक्यात मल्ल विद्या संस्कार कुस्ती फौडेशनच्या माध्यमातून तरुणांना मार्गदर्शन करण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात भविष्यात आयोजित केले जाणार असल्याची माहिती उपमहाराष्ट्र केसरी पै बबन काका काशिद यांनी दिली असून याचाच एकभाग म्हणून दि 12 जानेवारी रोजी राज्यस्तरीय हॉफ मॅराथॉन स्पर्धाजामखेड येथे आयोजित केली आहे, अशी माहिती पै. बबन काका काशिद यांनी दिली. स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे.

तालुक्यात कुस्तीचे आकर्षण निर्माण करण्याचे प्रयत्न कै विष्णू वस्ताद काशिद प्रतिष्ठाण यांचे मार्फत दरवर्षी पंचमीच्या काळात भव्य कुस्ती हगामा भरवून देशभरातील मल्लांना येथे संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील मल्लांना मोठी संधी मिळवून दिली जात आहे.

त्याच पार्श्वभूमीवर तरुणांना क्रिकेट, कब्बडी, खोखो, कुस्तीआणि क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कॉलेज जीवनात आर्मी, सैन्य भरती, पोलीस भरती च्या परीक्षा बाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.याच पार्श्वभूमीवर दि. 12 जानेवारी रोजी जामखेड शहरात राज्यस्तरीय हाफ मॅराथॉन पुरूष व महिला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
जामखेड तालुक्यात खेळाचे मैदान करण्यासाठी कुस्ती मल्ल विद्या काम करत आहे असे प्रा. मधुकर राळेभात यांनी सांगितले.
जामखेड मध्ये भव्य राज्यस्तरीय मॅरेथॉन दि 12 जानेवारी 2025 ला होणार.
मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशन आयोजित भव्य राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा चे आयोजन राजमाता जिजाऊ मासाहेब जयंती , स्वामी विवेकानंद जयंती व नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती निमित्त दिनांक 12 जानेवारी 2025 या दिवशी होणार आहे. अशी माहिती मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी बबन काका काशीद यांनी दिली.
या स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी आकारण्यात येणार नाही.