केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बेताल वक्तव्यचा जामखेड मध्ये भीमसैनिकांकडून निषेध व निर्देशने

0
472

जामखेड न्युज——

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बेताल वक्तव्यचा जामखेड मध्ये भीमसैनिकांकडून निषेध व निर्देशने

 

महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा भिमसैनिकांच्या वतीने जामखेड शहरात निर्देशने करत आंदोलन केले तसेच अमित शहा यांनी देशासह दलित समाजाची माफी मागावी अशी संतप्त भिमसैनिकांची मागणी केली तसे निवेदन तहसीलदार गणेश माळी यांना देण्यात आले.

दिल्ली येथे संसदेत चालु असलेल्या हिवाळी अधिवेशनात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून अपमानीत केले याचे पडसाद देशासह जामखेड शहरात उमटताना दिसले शेकडो भिमसैनिकांनी हातात बाबासाहेबांची प्रतिमा व निळे ध्वज घेऊन खर्डा चौकात निर्देशने आंदोलन केले यावेळी काही काळ वाहतुक कोंडी निर्माण झाली होती.

सुमारे 1 तास चाललेल्या आंदोलनात बाबासाहेब झिंदाबाद, संविधान झिंदाबाद,जोर से बोलो जय भिम,अमित शहा मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला यावेळी संतप्त भिमसैनिकांनी गृहमंत्री अमित शहा यांनी देशासह दलित समाजाची माफी मागावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदार गणेश माळी व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना देण्यात आले.

यावेळी भिमसैनिक सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, भिमटोला ग्रुपचे बापुसाहेब गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश सदाफुले, प्रा.सुनिल जावळे, राजेंद्र सदाफुले, वंचितचे प्रवक्ते बापुसाहेब ओव्हळ, सामाजिक कार्यकर्ते वसीमभाई कुरेशी,दादासाहेब घायतडक,बाळासाहेब आव्हाड, सचिन आण्णा सदाफुले,विक्रांत घायतडक,मुकुंद घायतडक,सचिन जाॅकी सदाफुले,सुकेंद्र सदाफुले, रंजन मेघडंबर, मनसे ता.उपाध्यक्ष सनी सदाफुले, बाळासाहेब घायतडक,वंचितचे ता.अध्यक्ष अतिश पारवे,किशोर सदाफुले,दिपक घायतडक, रवि सदाफुले,रिपाईचे ता.अध्यक्ष प्रमोद सदाफुले,रवि सोनवणे,अमोल सदाफुले,सुनिल काबंळे,किशोर काबंळे,संतोष थोरात,शेखर मोरे,लखन मोरे,सुखदेव घोडेस्वार,सुर्यकांत सदाफुले,अंकुश पुलावळे,मंगेश घोडेस्वार,गणेश घायतडक,सोनू सदाफुले,पप्पुराज सदाफुले,केतन घायतडक,सनी प्रिन्स सदाफुले, प्रतिक सदाफुले,विकीभाई गायकवाड, विकी काबंळे,अक्षय घायतडक,अक्षय गायकवाड,मिंलिद हराळ, हानुमान जावळे,भारतीय बौद्ध महासभेचे महिला जिल्हा सचिव सुरेखा सदाफुले,कुसुम साळवे,अरुणा सदाफुले सह आदी शेकडो भिमसैनिक व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here