जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील ट्रॅफिक जॅमची समस्या सोडविण्यासाठी व वाहतुकीसाठी शिस्त लावण्यासाठी नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी वर्दळीच्या ठिकाणी मार्किंग करून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करून वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर 25 वाहनांवर कारवाई करून सहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला व ट्रॅफिक जॅमची समस्या सोडवली आहे.
जामखेड शहरात बीड रोड ते जुने बसस्थानक तसेच खर्डा चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत होती शनिवारी बाजार दिवशी तर वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी एक एक तास लागत होता यामुळे आजारी रूग्ण, अपघात ग्रस्ताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. वाहतूक कोंडी हा दररोजचाच विषय झालेला होता. या वाहतुक कोंडीवर तातडीने तोडगा काढण्यासाठी नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पत्रकारांबरोबर चर्चा तसेच व्यापारी वर्गाशी चर्चा करून बीड रोड काॅर्नर पासून जुन्या बसस्थानकापर्यत तसेच खर्डा चौकात एक सरहद्द निश्चित करून फक्की मारून घेतली या मार्किंग च्या आतमध्ये गाडी पार्क करणे जर मार्किंग बाहेर गाडी लावलेली असेल तर त्या ठिकाणी असणारे पोलीस कर्मचारी व होमगार्ड गाडीचा फोटो काढून आॅनलाईन दंड करणार्या मशिन मध्ये घेतला असता गाडी मालक नाव येतो व त्यांच्या नावावर दंड पडतो तो त्याला आॅनलाईन किंवा आॅफलाईन भरता येतो. रस्त्यावर किंवा मार्किंग च्या आत गाडी लावली तर दोनशे रुपये दंड, मोबाईल फोन वर बोलत गाडी चालवताना दिसला तर हजार रुपये दंड, अठरा वर्षांच्या आत गाडी चालवणे, टिबल सीट गाडी चालवणे यासाठी दंड वसूल केला जात आहे.
आज पोलीस हेडकॉन्स्टेबल बापू गव्हाणे, पोलीस कॉन्स्टेबल शिवलिंग लोंढे, आजीनाथ जाधव, होमगार्ड माने आर. ए, अशोक राऊत, श्रीमंत कोल्हे, पवार चौकात तैनात होते. वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर 25 केसेस दाखल करण्यात आल्या व एकूण सहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळे आज शनिवार असुनही कसलीही वाहतूक कोंडी झाली नव्हती. यामुळे सर्वसामान्य जनतेमधुन या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.