कळे यांनीजामखेड प्रतिनिधी
जामखेड प्रतिनिधी
मुलांनो पोलीसांची भीती बाळगू नका, ते तुमचे मित्र आहेत. पोलीस त्यांची शस्त्रे समाजातील वाईट प्रवृत्तीच्या लोकांसाठी व गुन्हेगारांसाठी वापरतात. एखादी तक्रार द्यावयाची असल्यास पोलीस स्टेशनला यायला घाबरू नका पोलीस तक्रारीचे निराकरण करतील निष्कारण पोलीसांची भीती बाळगू नका असे आवाहन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना केले
पोलीस रेझिंग डे निमित्त ल.ना.होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गायकवाड बोलत होते. यावेळी उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, उपप्राचार्य पोपट जरे, पर्यवेक्षक रमेश आडसूळ, अश्रुबा फुंदे यांच्या सह सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुलींनीही कशा प्रकारे सावधानता बाळगली पाहिजे ओळखीच्या लोकांकडूनही कधी कधी गैरप्रकार केले जातात यासाठी मुलींनी कसे सावध राहिले पाहिजे असे सांगितले महिला सुरक्षा व सायबर गुन्हे याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत पवार तर आभार सचिन वाकळे यांनी केले.