कुर्ला बस अपघातात अनेकांना चिरडले सहा मृत्यू, 36 जण जखमी

0
1098

जामखेड न्युज——

कुर्ला बस अपघातात अनेकांना चिरडले सहा मृत्यू, 36 जण जखमी

मुंबईतील कुर्ला भागात काल भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 36 जण जखमी झाले आहेत. कुर्ला स्टेशन परिसरात बेस्ट बसने अनेकांना धडक दिली आहे. 25 ते 30 वाहनांना धडक दिली आहेत. काही नागरिकांना चिरडलं देखील आहे. यापैकी दोन जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. जखमींना जवळच्याच भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आतापर्यंत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 36 ते 40 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

दोन तासांनी क्रेनच्या साह्याने बस बाहेर काढण्यात आली आहे. बसचा स्पीड देखील अधिक असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर बसच्या काचा देखील फुटलेल्या आहेत. सध्या बस ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. ही बस 332 होती कुर्ल्यापासून अंधेरीला जात होती. हा अपघात कुर्लात घडला आहे.

कुर्ल्यातील बेस्ट बस अपघातात आता पर्यंत मृतांचा आकडा 6 झाला आहे. तर जखमी 36 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.विजय विष्णू गायकवाड(७०), आफ्रीन अब्दुल सलीम शहा(१९), अनम शेख(२०), कणीस फातिमा गुलाम कादरी(५५), शिवम कश्यप(१८) अशी मृतांची नावे आहेत.

जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल ६० प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी बस चालक संजय मोरे(५४) या बस चालकाला पोलिसांनी अटक केली गेली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलिस आणि एमएसएफ जवान ही जखमी झाले आहेत. यातील पीएसआय प्रशांत चव्हाण या जखमी अधिकाऱ्याच्या फिर्यादीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई कुर्ला पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here