जामखेड न्युज ———
भाजपाच्या सुनामीत कर्जत जामखेड च्या स्वाभीमानी जनतेने मला जिंकवले – रोहित पवार
जामखेड शहरात भव्य दिव्य विजयी मिरवणूक
भाजपाने या विधानसभा निवडणुकीत जाती जातीत विष कालवण्याचे काम केले. मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला एका एका बुथसाठी दहा दहा लाख रुपये खर्च केला तरीही कर्जत जामखेड च्या स्वाभीमानी जनतेने मला विजयी केले. आता मतदारांच्या विश्वासावर पुढचे पंचवीस वर्षे आपल्याला कोणी हलवू शकत नाही असे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
अटीतटीच्या लढतीत रोहित पवार यांनी बाजी मारली तेव्हा आज जामखेड शहरात भव्य दिव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी जामखेड तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन आभार मानले कुसडगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भाजपाने पैसा, दडपशाही केली, जाती जातीत वाद निर्माण केला पण सामान्य जनता माझ्या बरोबर राहिली माझा विजय 1243 मतांनी मिळाला असला तरी सर्व सामान्य जनतेच्या मते माझा विजय लाखांचा आहे.
ही लोकशाहीची हत्या
यावेळी बोलताना मरकडवाडी येथील आजच्या मतपत्रिका वरील मतदानाविषयी विचारले असता ते म्हणाले की, गावातील लोकांवर पोलीसांच्या माध्यमातून दडपशाही सुरू आहे. ही लोकशाही ची हत्या आहे. सर्व सामान्य नागरिकांना ईव्हीएम विषयी शंका आहे. बँलेट पेपर वर मतदान घेऊन द्यावयास हवे होते.
कुसडगावने स्वाभीमान दाखवून दिला
तालुक्यात सर्वात जास्त पैसे भाजपकडून कुसडगाव मध्ये आले पण कुसडगाव च्या स्वाभीमानी जनतेने मला गावात मताधिक्य दिले. तालुक्याच्या पुढाऱ्यांपेक्षा सर्व सामान्य जनता भारी ठरली
नागरिकांचा निकालावर विश्वास नाही