आमदार रोहित पवार यांच्या विजयाबद्दल भव्य विजयी रॅली उद्या जामखेडमध्ये
कार्यसम्राट आमदार मा श्री रोहित दादा पवार यांची कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल कोठारी पेट्रोल पंप ते मार्केट यार्ड पर्यंत उद्या दि 3 डिसेंबर 2024 रोजी दुपारी भव्य विजयी रॅली काढण्यात येणार आहे.
तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सर्वांनी उद्या दुपारी 2 वाजता कोठारी पेट्रोल पंप येथे उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघातील उमेदवार आ. रोहीत (दादा) पवार हे निवडुन आल्यानंतर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता.
याच अनुषंगाने उद्या दि 3 डिसेंबर रोजी दुपारी जामखेड शहरातुन भव्य विजयी मिरवणूक रॅली आ. रोहीत दादा पवार मित्र मंडळाच्या वतीने काढण्यात येणार आहे.
जामखेड शहरात कोठारी पेट्रोल पंप ते मार्केट यार्ड पर्यंत भव्य दिव्य अशी विजयी रँलीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पक्षाचे पदाधिकारी, महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.