सोशल मीडियावर आत्महत्या करत असल्याचे सांगत डॉ. रोहिदास लटपटे यांची कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या
जामखेड, राजुरी परिसरात शोककळा
जामखेड तालुक्यातील राजुरी येथील डॉ. रोहिदास अशोक लटपटे वय ३७ यांनी सोशल मीडियावर आत्महत्या करत असल्याचे सांगून बुधवारी रात्री नऊ च्या आसपास शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
डॉ. रोहिदास अशोक लटपटे हे व्हिटरनरी डॉक्टर होते. परिसरात प्रॅक्टिस करत होते. सध्या ते कर्जबाजारी झाले होते. यामुळे ते चिंताग्रस्त होते. यातच त्यांनी बुधवारी रात्री साडेआठ वाजता सोशल मीडियावर मी गावातील डीपीजवळ आत्महत्या करत आहे असा मेसेज सोशल मीडियावर टाकला यामुळे नातेवाईक मित्रमंडळी गावातील डीपीजवळ जमले पण डॉ. रोहिदास तिथे नव्हते मग नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. तेव्हा समाधान सिताराम आंबेडकर यांच्या शेतात बालाजी मंदिराजवळ लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
गळफास घेतलेली खबर जामखेड पोलीसांना पोलीस पाटील दत्तात्रय मोरे यांनी दिली यानंतर जामखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा केला यावेळी गावातील सरपंच सागर कोल्हे, पोलीस पाटील दत्तात्रय मोरे, काकासाहेब कोल्हे, गोकुळ कोल्हे, बापू काळदाते यांच्या सह अनेक नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.
पोलीस पंचनामा झाल्यानंतर डेड बाँडी ग्रामीण रुग्णालय येथे आणली सकाळी साडेनऊ वाजता वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरी यांनी शवविच्छेदन केले यानंतर शोकाकुल वातावरणात राजुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉ रोहिदास लटपटे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई, भाऊ चुलते असा परिवार आहे.