आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारासाठी शेतकरी नेते पाशा पटेल व नरेंद्र पाटील यांच्या तोफा उद्या जामखेडमध्ये धडाडणार
२२७ कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रा राम शिंदे यांच्या प्रचारासाठी शेतकरी नेते पाशाभाई पटेल व आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र आण्णासाहेब पाटील यांच्या तोफा धडाडणार आहेत तरी सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.
आमदार प्रा राम शिंदे यांच्या प्रचारासाठी दि. १४ गुरूवार रोजी सायंकाळी ६.०० वा. तहसील कार्यालयासमोरील मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.
पाशाभाई पटेल हे शेतकरी चळवळीतून पुढे आलेले आक्रमक नेते म्हणून पाशा पटेल यांची राज्यभरात ओळख आहे. महायुतीचे सरकार आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१७ मध्ये त्यांची राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. तसेच ते माजी आमदार विधानपरिषद आहेत.
तसेच नरेंद्र आण्णासाहेब पाटील (अध्यक्ष) मंत्री दर्जा आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य या महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत कर्जपुरवठा करण्यात येतो.
नरेंद्र आण्णासाहेब पाटील व पाशाभाई पटेल यांची जाहीर सभा दि. १४ गुरूवार रोजी सायंकाळी ६.०० वा. तहसील कार्यालयासमोरील मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. तरी सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, आरपीआय आठवलेगट, महायुती मित्र पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.