श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी सप्ताहाची ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता सुनंदाताई पवार यांनी घेतला किर्तनाचा आनंद

0
409

जामखेड न्युज——

श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी सप्ताहाची ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता

सुनंदाताई पवार यांनी घेतला किर्तनाचा आनंद

 

हभप उत्तम महाराज वराट यांच्या नेतृत्वाखाली
श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भव्य -दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमत भगवतगिता पारायण सोहळ्याची साकत मध्ये मोठ्या उत्साहात आश्विन वद्य १ शुक्रवार दिनांक 18 पासून सुरूवात झालेल्या सप्ताहाची सांगता आश्विन वद्य ९ शुक्रवार २५ रोजी सांगता ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांच्या काल्याच्या कीर्तनाने मोठ्या गर्दीत सांगता झाली.

त्यांनी किर्तन सेवेसाठी तुकाराम महाराजांचा अभंग घेतला होता.

पाहाती गौळणी । तंव पालथी दुधाणी ॥१॥

म्हणती नंदाचिया पोरें । आजि चोरी केली खरें ॥ध्रु.॥

त्याविण हे नासी । नव्हे दुसरिया ऐसी ॥२॥

सवें तुका मेळा । त्याणें अगुणा आणिला ॥३॥

अर्थ

दुधाची सर्व भांडी पालथी घालून ठेवलेली गौळणीनी पाहिली ।।1।।

त्या म्हणाल्या, नंदाच्या। मुलाचे हे काम आहे. त्यानेच ही चोरी केलि ।।ध्रु।।

दुधाची अशी नासाड़ी दूसरे कुणी करणार नाही ।।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, हां मेला तुक्या त्यांच्याबरोबर होता, त्यानेच निर्गुण अश्या इश्वराला बरोबर आणले असले पाहिजे ।।3।।.

यावेळी मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित होते
सुनंदाताई पवार, पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, उपसरपंच राजाभाऊ वराट, सुनील वराट, अजित वराट, गणेश कडभने, मुख्याध्यापक दत्ता काळे, अजित वराट, राजकुमार थोरवे, अर्जुन रासकर, सचिन वराट, मुकुंद वराट, प्रसाद होशिंग, अतुल दळवी, आण्णा विटकर यांच्या सह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीगुरू वै. ह. भ. प. प. पु. आदरणीय वंदनीय रामचंद्र बोधले महाराज हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. यांनी साकत मध्ये विठ्ठल मंदिरात १ मे १९५५ मध्ये अखंड विनावादन व नंदादीप सुरू केलेली आजपावोती सुरूच आहे. त्यांच्या ४२ व्या पुण्यतिथीचे आयोजन ह. भ. प. विवेकानंद भारती उर्फ उत्तम महाराज वराट यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व साकत परिसरातील भक्तगणांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

किर्तन सेवेसाठी नामवंत महाराज, वादक, गायक सात दिवस उपस्थित होते.

किर्तन सेवेसाठी महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य हभप पंडित केशव महाराज जगदाळे, जालिंदर बप्पा येडशीकर, भरत पठाडे, आसाराम महाराज साबळे, नामदेव महाराज, म्हेत्रे महाराज, यादव महाराज, बाजीराव महाराज वराट, मदन महाराज टिपरे, उत्तरेश्वर महाराज टिपरे, भिमराव महाराज मुरूमकर, बाबा महाराज मुरूमकर, बाळू सुरवसे, मच्छिंद्र वाळेकर, हरिदास आबा गुंड, दिपक अडसूळ उपस्थित होते.

गायनाचार्य – हभप बिभीषण महाराज कोकाटे, हरीभाऊ महाराज काळे, कृष्णा महाराज मोरे, ज्ञानेश्वर महाराज कोल्हे, भरत महाराज साठे, नामदेव महाराज, म्हेत्रे महाराज, यादव महाराज,
अशोक सपकाळ, दिनकर मुरूमकर, भास्कर फुंदे, केशव घोलप, विष्णू म्हेत्रे, दादा आजबे, भाऊसाहेब कोल्हे, पंढरीनाथ राजगुरू, भरत घोलप, आण्णा घुमरे, गहिनीनाथ सकुंडे, प्रकाश महारनवर, नाना महारनवर, जालिंदर महारनवर, कल्याण राऊत, दत्ता घुमरे सह परिसरातील सर्व भजनी मंडळे,
भजन कीर्तन व्यवस्थापक दिनकर मुरूमकर, श्रीकांत वराट, पांडुरंग अडसूळ, रामकिसन लहाने, दिपक अडसूळ यांच्या सह परिसरातील भजनी मंडळे गावातील भजनी मंडळ व नर्मदेश्वर वारकरी गुरूकुलातील सर्व विद्यार्थी सात दिवस हजर राहिले.

सप्ताहाचे संयोजक म्हणून हभप विवेकानंद भारती महाराज उर्फ उत्तम महाराज वराट, मृदंगाचार्य बाजीराव महाराज वराट व उत्तरेश्वर महाराज वराट फोटोग्राफर ओम दळवी होते तर मंडप व साउंड सिस्टीम आनंद मंडप बळी लोहार यांचे होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here