जामखेड न्युज——
जागतिक तायक्वांन क्रीडा स्पर्धेत भारताला लक्ष्मण उदमले यांनी मिळवून दिले कांस्यपदक
आंतरराष्ट्रीय वुशू स्पर्धेत रौप्य पदक पटकावणारे तालुक्यातील वाकी येथील रहिवासी लक्ष्मण उदमले यांनी दक्षिण कोरिया येथील चुंग जु येथे नुकत्याच जागतिक तायक्वांन क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत कांस्यपदक मिळविले.
चुंग जु, दक्षिण कोरिया येथे नुकत्याच जागतिक तायक्वांन क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये वाकी गावचे सुपुत्र लक्ष्मण भगवान उदमले यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत कांस्यपदक मिळविले.
त्यांनी यापूर्वी वुशु या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळविलेले आहे. लक्ष्मण उदमले सध्या एकलव्य शाळा,मवेशी येथे क्रीडा शिक्षक म्हणून काम करत आहेत.
त्यांना तायक्वांन असोशिएशन ऑफ इंडिया चे महासचिव राज वागदकर यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांना जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे , माजी जि.प.सदस्य प्रा. मधुकर राळेभात, प्राचार्य डॉ.देविदास राजगिरे, शाम पंडित, आबा जायगुडे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.