साकत ग्रामपंचायतचे माजी लिपीक दादासाहेब (आबा) वराट वय ७८ यांचे अल्पशा आजाराने रात्री निधन झाले यामुळे साकत परिसरात शोककळा पसरली आहे. अंत्यविधी साकत येथे दुपारी एक वाजता होणार आहे.
दादासाहेब वराट यांनी ग्रामपंचायत लिपीक पदावर काम केले होते. आठ दिवसांपूर्वी शेतात जात असताना गाडीवरून पडले होते त्यामुळे त्यांना नगर येथे खाजगी हाँस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. तसेच मनक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दवाखान्यात असताना त्यांना निमोनियाचा त्रास झाला यातच त्यांचे निधन झाले यामुळे साकत परिसरात शोककळा पसरली आहे.
दादासाहेब वराट यांच्या मागे पत्नी दोन मुली, दोन मुले सुन नातवंडे असा परिवार आहे. दुपारी एक वाजता साकत येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे.