जामखेड न्युज——
सहा महिन्यात जामखेडकरांना दररोज पिण्याचे पाणी मिळणार – आमदार प्रा. राम शिंदे
आदर्श नगरसेवकाचे उत्तम उदाहरण म्हणजे अमित चिंतामणी – जान्हवी किल्लेकर
गेल्या दहा वर्षापासून अमित चिंतामणी यांच्या वतीने ओपन गरबा दांडिया
गेल्या पाच वर्षात जामखेड करांना खुप सोसावे लागले, फक्त भुलथापा मिळाल्या तसेच माझा पराभव झाल्याने पिण्याच्या पाण्याची अडचण सहन करावी लागली आठ दिवसांतून एकदाच पाणी मिळत आहे. आता परत मी तुमच्या समोर येत आहे. आता सहा महिन्यात पिण्याचे स्वच्छ पाणी दररोज जामखेड करांना मिळणार आहे. असे आमदार प्रा. राम शिंदे म्हणाले.
अमित चिंतामणी यांच्या वतीने महिलांसाठी ओपन गरबा दांडिया कार्यक्रमाचे नेटके नियोजन जामखेड महाविद्यालय जामखेड येथे करण्यात आले होते यावेळी आमदार प्रा राम शिंदे बोलत होते.
यावेळी आमदार प्रा. राम शिंदे, जान्हवी किल्लेकर, आशा शिंदे, प्रा. मधुकर राळेभात, अमित चिंतामणी, प्रांजळ चिंतामणी, अंजली चिंतामणी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, डॉ. भगवानराव मुरुमकर, पोपटनाना राळेभात, बाजीराव गोपाळघरे, अर्चना राळेभात, जमीर सय्यद, पवन राळेभात, मोहन पवार, विष्णू गंभीरे, मनोज कुलकर्णी, तुषार बोथरा, उद्धव हुलगुंडे, केदार रसाळ, प्रविण सानप, प्रविण चोरडिया, तात्या पोकळे, मनिषा सुरवसे, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार प्रा राम शिंदे यांनी सांगितले की, टिव्ही वर दिसणारे कलाकार जामखेड करांच्या भेटीला दरवर्षी आणले जातात. तसेच कार्यक्रमाचे नियोजन एकदमच हटके असते. जामखेड शहरातील प्रत्येक प्रभागातील लोक विचारतात आमच्या प्रभागात अमित चिंतामणी सारखे दर्जेदार कामे का नाहीत. अमित चिंतामणी वर जामखेड करांचा खुप मोठा विश्वास आहे.
यावेळी बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर हिने जामखेड करांशी मनमोकळेपणाने संवाद साधला ती म्हणाली मला बीग बाँसने मान प्रतिष्ठा सर्व काही दिले आहे. कलाकारांना कौतुक हवे असते. आणि ते बिग बॉस ने दिले आहे. आमच्या साठी तुम्हीच सेलेब्रिटी आहात. आदर्श नगरसेवक उत्तम उदाहरण म्हणजे अमित चिंतामणी समाजकार्यात खुप पुढे जाल अशा शुभेच्छा दिल्या प्रामाणिकपणे प्रयत्न करा यश मिळणारच असेही सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित चिंतामणी यांनी करताना सांगितले की, गेल्या दहा वर्षांपासून कार्यक्रम घेत आहे पडद्यावरील सिने कलाकारांना जामखेड करांच्या भेटीला दरवर्षी आणण्यासाठी मी नेहमीच प्रमाणिक प्रयत्न करतो कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. मधुकर राळेभात होते
दर्जेदार विकास कामांसोबत मनोरंजनात्मक कार्यक्रम राबविणारे नगरसेवक म्हणून अमितची ओळख
जामखेड शहरातील सर्वात दर्जेदार कामे असणारा प्रभाग म्हणून अमित चिंतामणी यांचा प्रभाग तेरा ओळखला जातो. नगरसेवक म्हणून प्रभागातील नागरिकांना दिलेले आश्वासन व नागरिकांची मागणी यानुसार प्रभागातील १०० टक्के कामे पूर्ण केली आहेत. काही कामे तर पदरमोड करून पुर्ण केलेली आहेत.
प्रभागात सिमेंट किंवा पेव्हिंग ब्लॉक असणारे रस्ते, भुमीगत गटारे अशी अनेक कामे तीही दर्जेदार असा प्रभाग तेरा आहे. विकास कामांसोबत दरवर्षी मनोरंजनात्मक विविध कार्यक्रम चिंतामणी यांच्या मार्फत राबवले जातात. गेल्या दहा वर्षांपासून दरवर्षी महिलांना मोहटादेवीचे दर्शन, महिलांसाठी गरबा दांडिया कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.