जामखेड न्युज——–
साकतमध्ये श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी सप्ताहानिमित्त वीस वर्षापासून वानर लावते हजेरी
महान संत श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज यांचे ४१ वर्षापूर्वी देहावसन झाले तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी वानर आले होते. अंत्यसंस्कार होईपर्यंत होते दुसऱ्या दिवशी हस्ती गोळा करण्यासाठी पण ते हजर होते. अशा या महान संताच्या पुण्यतिथी निमित्त साकत मध्ये हभप उत्तम महाराज वराट यांनी सुमारे वीस वर्षांपूर्वी सप्ताह सुरू केला गेल्या वीस वर्षांपासून पुण्यतिथी सप्ताह निमित्त दरवर्षी वानर हजेरी लावते ही विशेष बाब आहे.
श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज (आबा) हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. त्यांनी नैष्ठिक ब्रम्हचारी जीवन जगून अवीरथ भगवंत भक्ती केली. ब्रम्हचारी व्रताची पावती म्हणून अंत्यविधीला वानराच्या रूपाने हजर राहून स्वतः अस्ती बाजूला काढून रक्षा सावडली ते आजही नामसप्ताहमध्ये प्रत्यक्षात आठ दिवस वानर रूपाने हजेरी लावते. आज सुरू होणाऱ्या सप्ताह साठी कालच दोन वानराने हजेरी लावली आहे.
अशा सत्पुरुषाच्या हस्ते साकत येथे १ मे १९५५ साली अखंड वीणा व नंदादीप विठ्ठल मंदिरात सुरू केले ते आजपावेतो सुरू आहे. अशा पुण्यभूमीत श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज (आबा) यांचे ४२ वी पुण्यतिथी सप्ताह आयोजित करण्यात आला आहे या सप्ताह साठी वानराने कालच गावात हजेरी लावली आहे आता आठ दिवस ते गावात राहणार आहे. सकाळी सप्ताह मंडपात वानराने हजेरी लावली. साकत पंचक्रोशीतील लोक वानराला आताच्या रूपाने पाहतात. व दर्शन घेतात.
हभप उत्तम महाराज वराट यांच्या नेतृत्वाखाली
श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भव्य -दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमत भगवतगिता पारायण सोहळ्याची साकत मध्ये मोठ्या उत्साहात आज आश्विन वद्य १ शुक्रवार दिनांक 18 पासून सुरूवात होत आहे. तर सांगता आश्विन वद्य ९ शुक्रवार २५ रोजी सांगता आहे तरी भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ परिसरातील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन आयोजक हभप उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.
सर्व सज्जन भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होत आहे कि, श्रीगुरू वै. ह. भ. प. प. पु. आदरणीय वंदनीय रामचंद्र बोधले महाराज हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. यांनी साकत मध्ये विठ्ठल मंदिरात १ मे १९५५ मध्ये अखंड विनावादन व नंदादीप सुरू केलेली आजपावोती सुरूच आहे. त्यांच्या ४२ व्या पुण्यतिथीचे आयोजन ह. भ. प. विवेकानंद भारती उर्फ उत्तम महाराज वराट यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व साकत परिसरातील भक्तगणांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताह साठी गेल्या वीस वर्षापासून वानर नित्यनेमाने हजेरी लावत आहे.
दरवर्षी पुण्यतिथी सप्ताह साठी गेल्या वीस वर्षापासून वानर नित्यनेमाने हजेरी लावत आहे हे विशेष आहे.