भगवानगडाचे उत्तराधिकारी कृष्णा महाराज शास्त्री, नामदेव शास्त्रींची घोषणा

0
917

जामखेड न्युज——

भगवानगडाचे उत्तराधिकारी कृष्णा महाराज शास्त्री, नामदेव शास्त्रींची घोषणा

 

भगवान गडाचे पुढचे उत्तराधिकारी ठरले आहेत. याबाबत महंत नामदेव शास्त्रींनी घोषणा केली आहे. भगवान गडाचे उत्तराधिकारी म्हणून कृष्णा महाराज शास्त्री यांच्या नावाची नामदेव शास्त्री यांनी घोषणा केली. कृष्णा शास्त्री हे भगवान गडाचे चौथे उत्तराधिकारी आहेत.

श्रीक्षेत्र भगवानगडाचे चौथे उत्तराधिकारी म्हणून कृष्णा महाराज शास्त्री यांची निवड करण्यात आली आहे. गडाचे विद्यमान महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांनी ही घोषणा केली.

नवनियुक्त महंतांना एकनाथवाडीवरून रथात बसवून ढोल-ताशा, टाळ-मृदंग बाबांचा जयघोष करत भाविकांनी गडावर आणले. भगवानगडावर संत ज्ञानेश्वर माउली मंदिराचे काम सुरू आहे. दोन वर्षांनंतर ते काम पूर्ण होणार आहे. लोकार्पण सोहळ्याच्या वर्षी भगवान गडाचा अमृतमहोत्सव असून, या वेळी कृष्णा महाराज यांना गादीचे हस्तांतरण करण्यात येणार आहे.

कोण आहेत कृष्णा शास्त्री?

कृष्णा महाराज शास्त्री यांचं गाव तेलंगणात आहे. तेथे महंत नामदेव शास्त्रींसोबत त्यांची भेट झाली होती. बारा वर्षांपूर्वी ते गडावर आले होते. ज्ञानेश्वरीचे संपूर्ण शिक्षण गडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठात झाले आहे, नामदेव शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध आध्यात्मिक विषयांचा अभ्यास पूर्ण केला आहे. कृष्णा शास्त्री यांनी तीन वर्षांपूर्वी एकनाथवाडी येथील निरंजन संस्थान या ठिकाणी महंत म्हणून कार्यभार स्विकारला आहे.

 

महंत नामदेव शास्त्री यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मुंडेंच्या दसरा मेळाव्यानिमित्त भगवानगड हा अधिक चर्चेत आला होता. तर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांना या ठिकाणी दसरा मेळावा घेण्यास महंत नामदेव शास्त्री यांनी विरोध केला. त्यामुळे नामदेव शास्त्री यांच्यासह भगवानगड हा चांगलाच चर्चेत आला होता. मोठ्या संख्येने राज्यातील भाविक दर्शनासाठी याच गडावर येत असतात. मुंडे आणि भगवानगड हे समीकरण नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे.

वारकरी संप्रदाय भगवान गडाला आपले पवित्र स्थान मानतो. 60 दशकात नावारुपास आलेल्या आणि प्रसिद्ध झालेल्या किर्तनकारांच्या नावावरुन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी भगवानगड हे नाव दिले होते. अहमदनगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर हा भगवान गड आहे. भगवानगडान मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यातील लोक दर्शनासाठी येत असतात.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here