जामखेड न्युज——
साकत घाटात तीस टन तांदुळाची गाडी दरीत कोसळली
रात्रीत मोठ्या प्रमाणावर तांदूळ लंपास
कर्नाटक राज्यातून बारामती येथे सुमारे तीस टन तांदूळ घेऊन चाललेली गाडी साकत घाटात रात्री आठच्या आसपास वळणावर अंदाज न आल्याने गाडी घाटात गेली ड्रायव्हर व किनर यांनी उड्डी मारल्याने ते किरकोळ जखमी झाले असून जामखेड येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. रात्रीच्या वेळी घाटात गाडी पलटी झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांना कळताच नागरिकांनी अंधारात मोठ्या प्रमाणावर तांदूळ लंपास केला.
धुळे नंदुरबार येथील प्रभाकर पाटील यांच्या मालकीची गाडी कर्नाटक हून बारामती येथे बिअर बनवण्यासाठी लागणारा तांदूळ घेऊन 14 टायर गाडी अशोक लेलंड एम 18 बी जी 3636 क्रमांकाची गाडी चाललेली होती. साकत घाटात वळणावर अंदाज न आल्याने गाडी घाटात खोल दरीत कोसळली यावेळी चालक व मदतनीस यांनी उड्डया मारल्याने जीव वाचला पण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्या वर जामखेड येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. गाडीचे पासिंग 42 टनाचे आहे.
जामखेड सौताडा महामार्गाचे गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत संथ गतीने काम सुरू आहे. पुलाचे काम व खराब रस्ता यामुळे वाहने साकत मार्गी ये जा करतात. रात्री कर्नाटक हून बारामती येथे बिअर बनवण्यासाठी लागणारा तांदूळ घेऊन चाललेली गाडी रात्री आठच्या आसपास वळणावर टर्न न बसल्याने पलटी झाला सुदैवाने जीवीत हानी झाली नाही ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तांदूळ सर्वत्र अस्ताव्यस्त पडलेला होता. परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर तांदूळ लंपास केला लवकरात लवकर घाटाचे रूंदीकरण करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम खुपच संथ गतीने सुरू आहे. यामुळे अनेक वाहने साकत मार्गी ये – जा करतात. साकतचा घाट खुपच अरूंद आहे त्यामुळे वळणाचा नीट अंदाज येत नाही यातून नेहमीच अपघात होतात.
सध्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग चे काम खुपच संथगती ने सुरू आहे. यामुळे अनेक वाहने साकत मार्गी ये जा करतात पण सौताडा घाटापेक्षा साकत घाट कठीण व अरूंद आहे यामुळे चालकाला अंदाज येत नाही यामुळे अपघात होतात. घाट रूंदीकरण करण्याची मागणी होत आहे.
एका वर्षात साकत घाटात दहा ते बारा अपघात झाले आहेत यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे. यामुळे ताबडतोब घाटाचे रूंदीकरण करण्याची मागणी होत आहे.
सध्या सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. तसेच साकत फाटा ते धोत्री पर्यंत रस्त्यावर अनेक झाडांचे फाटे रस्त्यावर आलेली आहेत. त्याची छाटणी करावी व रस्त्यावरील खड्डे बुजवावेत आशी मागणी हरीभाऊ पोपट मुरूमकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तर नागराज मुरूमकर यांनी घाटात बँरिकेटर्स बसवण्याची मागणी केली होती यानुसार बँरिकेटर्स बसवण्याचे काम सुरू आहे. बँरिकेटर्स तोडून गाडी खाली गेलेली आहे.