जामखेड न्युज——
नगरसेवक अमित चिंतामणी कडून शेकडो माताभगिनींना मोहटादेवीचे दर्शन
समाजसेवेचा वसा जपणारे नगरसेवक म्हणून आगळीवेगळी ओळख
नगरसेवक अमित चिंतामणी हे गेल्या ९ वर्षांपासून नवरात्र उत्सवानिमित्त निमित्ताने विविध उपक्रम राबवतात तसेच शहरातील माता भगिनींना पाथर्डी येथील मोहटा देवीच्या दर्शनासाठी घेऊन जात असतात.
याच अनुषंगाने सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील नगरसेवक अमित चिंतामणी यांनी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आज रोजी सकाळी अकरा वाजता सुमारे ५०० ते ७०० माता भगिनींना घेत पंचायत समिती समोरून ४९ क्रुझर गाड्यांचा ताफा रवाना झाला. माता भगिनींनी मोहटादेवी दर्शनाचा लाभ घेतला.
आज रोजी शहरातील देशमुख गढी येथून पायी चालत छत्रपती शिवाजी महाराज पेठ, जयहिंद चौक, खर्डा चौक येथून फटाक्यांच्या आतीषबाजीत व हलगी वाजत – गाजत पंचायत समिती( पुढारी वड) समोर मोहटादेवी दर्शनासाठी निघताना मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करून माहिला भाविकांना मोहटादेवी दर्शनासाठी रवाना करण्यात आले.
यावेळी माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर, जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, बाजार समितीचे सभापती पैलवान शरद कार्ले,सोन्याचे व्यापारी विलासशेठ चिंतामणी,रविंद्र सुरवसे, ॲड प्रविण सानप,भाजपा शहराध्यक्ष पवन राळेभात, नगरसेवक दिगंबर चव्हाण,अमित जाधव, सामाजिक कार्यकर्ते केदारशेठ रसाळ, संजय मुळे,महालिंग कोरे,भाऊ परदेशी, उमाकांत देशमुख, नागेश घायाळ, बाळासाहेब हारणे, सुर्यकांत माने, गणेश काळे,ईश्वर साळुंके,गोरख कुलथे,बाबासाहेब फुलमाळी, तुषार बोथरा, योगेश राऊत,प्रशांत राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
शारदीय नवरात्रोत्सव सुरु झाला असल्याने पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवीच्या दर्शनासाठी भावीक भक्त मोहटा देवी गडावर लाखोंच्या संख्येने येत असतात. याच अनुषंगाने धार्मिक परंपरेचा वारसा लाभलेले भाजपचे आ. राम शिंदे यांचे खंदे समर्थक नगरसेवक अमित चिंतामणी हे गेल्या ९ वर्षांपासून माता भगिनींना मोहटा देवी दर्शन घडवुन आणतात.
तसेच माहिला भाविकांना नऊ दिवस उपवास असल्याने दुपारी मोहटा देवीच्या पायथ्याला सर्वांसाठी महाप्रसादाची सोय केली होती. दर्शन घडवुन आणल्याने प्रभागातील माहिलांनी त्यांचे आभार व्यक्त केले.