जामखेड न्युज———
बारामती अँग्रो कडून झालेल्या फसवणूकीविरोधात
कुंडलीक जायभाय व कृष्णा जायभाय यांचे उपोषण सुरू
विविध मान्यवरांचा उपोषणाला पाठिंबा
आमदार साहेबांना घर बांधायचे म्हणून बारामती अँग्रोने माझ्या पाच एकर जमिनीपैकी दोन एकर जमीन घेतली व राहिलेल्या जमिनीचे बिनशेती, कम्पाउंड, क्राँक्रीट रस्ते, लाईट ची सुविधा करू म्हणून खरेदीखत न करता साठेखत करून जमिनीचा मोबदला चेक दिला तो चेक बाऊन्स झाला नंतर ती जमीन आमच्या परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विकली आमच्या जमीनीचा आम्हाला मोबदला मिळाला नाही. व जमिनीचा विकासही झाला नाही. आमची फसवणूक झाली आहे. याविरोधात कुंडलीक जायभाय व कृष्णा जायभाय यांनी कर्जत तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.
आज दि. १ आँक्टोबर पासून कर्जत तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. आज उपोषण स्थळी कर्जत जामखेड मतदारसंघातील प्रा. मधुकर राळेभात, प्रविण घुले, राजेंद्र गुंड, शरद शिंदे, प्रविण बोलभट, आण्णासाहेब ढवळे, जमीर सय्यद, नानासाहेब निकत, शेखर खरमाळे, सारंग घोडेस्वार, उद्धव हुलगुंडे, बिभीषण खोसे यांच्या सह अनेक मान्यवरांनी उपोषणाला पाठिंबा दिला.
कुंडलीक जायभाय यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बारामती अँग्रो प्रा. लि. या कंपनीचे प्रतिनिधी सुभाष गुळवे यांनी ऑगस्ट-२०२१ मध्ये माझी समक्ष भेट घेऊन आपले मतदार संघाचे आमदार साहेब यांना कर्जतमध्ये राहण्यासाठी घर बांधायचे आहे व त्यांना त्या करिता आपले भांडेवाडी येथील क्षेत्र घर बांधणीसाठी पसंत झालेले आहे व त्याकरिता आम्हाला आपल्या जागेची आवश्यकता आहे, असे कळविले होते.
त्यानुसार चर्चे अंती माझी जमीन मौजे भांडेवाडी येथील गट क्र. ५१०/२ एकूण क्षेत्र २=०० हे. (५ एकर) या पैकी २ एकर क्षेत्र रोहित पवारयांचे घर बांधण्यासाठी देण्याचे ठरले होते. तसेच सदर व्यवहार करताना आपल्या मतदार संघाचे आमदार आपल्या जमिनीत घर बांधणार आहेत. त्याचबरोबर आपल्या उरलेल्या जागेची संपूर्ण development करून (बिनशेती (N.A.) करणे, कंपाऊंड करणे, अंतर्गत रस्ते काँक्रिटचे व इलेक्ट्रिकची सोय) आम्ही करून देऊ, तसेच लगतच्या रस्त्यांची सुधारणा होईल. असा मला विश्वास दिला. कोरोना महामारीमुळे व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे मला देखील व्यवसायासाठी तसेच प्रापंचिक गरजेसाठी पैशांची गरज असल्यामुळे सदर व्यवहार करण्यास मी तयार झालो.
या सर्व गोष्टींमुळे त्यांच्यावर प्रामाणिक हेतूने व तत्कालीन बाजारभावापेक्षा कमी किमतीने मी व्यवहार करून देण्यास तयार झालो. तसेच सदरचा व्यवहार हा बारामती अँग्रो प्रा. लि. या कंपनीच्या नावाने करून घेऊ, असे सुभाष गुळवे यांनी सांगितले व सदरचा व्यवहार दि. २०/१०/२०२१ रोजी करण्याचे ठरविले. परंतु सदर जागेचे खरेदीखत न करता त्यांनी साठेखताचा दस्त करून घेतला. त्यानुसार त्यांनी मला जागेचा मोबदला म्हणून एकूण रक्कम रु. ५२,००,०००/- दि. १८/१०/२०२१ रोजीचा चेक मला दिला. सदरचा व्यवहार झाल्याच्या दोन दिवसानंतर म्हणजेच दि. २२/१०/२०२१ रोजी सदर व्यवहाराचा चेक मी माझे स्टेट बँकऑफ इंडिया, अहमदनगर येथे माझ्या खात्यात भरला असता सदरचा चेक न वठता परत आला. त्या नंतर वारंवार विनंती करून देखील मला कोणत्याही प्रकारचे पैसे देण्यात आलेले नाही.
तसेच सदरचा व्यवहार पूर्ण न करता राजकीय बळाचा वापर करून व शासकीय अधिकाऱ्यांवर दबावतंत्र वापरून परस्पर सदरचे माझे क्षेत्र दि. १३/०४/२०२३ रोजी तिऱ्हाईत इसमांना विकून टाकलेले आहे. सदरच्या माझ्या २ एकर जमिनीबाबत मला दि.२०/१०/२०२१ पासून आज अखेरपर्यंत कसलेही पैसे मिळालेले नाहीत.सदर झालेल्या घटनेनंतर मी कोर्टात दाखल केलेल्या दाव्यामध्ये देखील कोर्टाने माझी फसवणूक झाल्याचे सविस्तर निरीक्षण करून मनाई हुकमाचा आदेश पारित केलेला आहे.
सदरच्या प्रकारांमुळे मला व माझ्या कुटुंबाला मागील २ वर्षांपासून मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरेजावे लागत आहे. वर नमूद केल्याप्रमाणे सदरच्या व्यक्ती स्थानिक प्रशासनाची मदत घेऊन घाईघाईने कंपाउंडकरणे तसेच खोट्या पीक-नोंदी करणे अशा व इतर प्रकारे माझी जमीन बळकविण्याचे प्रयत्न करीत आहेत.तसेच मी भटक्या विमुक्त जमातीतील असल्यामुळे सदरच्या प्रकरणात स्थानिक प्रशासनाकडून मला कायमच दुय्यम वागणूक दिली जात असल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे माझ्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध न्याय मिळवण्याकरिता मला आता उपोषण करण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही. असे जायभाय यांनी सांगितले.
वरीलप्रमाणे माझ्यावर झालेला अन्यायाची दखल मा. श्री. गोपीचंदजी पडळकर साहेब (आमदार, विधानपरिषद) यांनी घेऊन दि. १२/०७/२०२४ रोजी विधानपरिषद सभागृह, मुंबई येथे सदर घटना सविस्तर मांडून माझ्यावर झालेल्या अन्यायाची चौकशी करून न्याय करण्यात यावा, अशी विनंती केलेली होती. परंतु त्यानंतर देखील माझ्यावर झालेल्या अन्यायाला कोणत्याही प्रकारे सहकार्य केले जात नाही अथवा त्यावरकोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे माझ्यावर वारंवार होत असलेल्या अन्यायाविरुद्ध न्याय मिळवण्या करिता मी दि.०१/१०/२०२४ रोजी तहसील कार्यालय, कर्जत समोर आमरण उपोषणाला बसले आहेत.