जामखेड न्युज——
जामखेड मधील बडा नेता रोहित पवारांच्या गळाला
शरदचंद्र पवारांच्या उपस्थितीत खर्डा येथे करणार पक्ष प्रवेश
कर्जत जामखेड मतदारसंघातील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला याची परतफेड करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनीही व्युव्हरचना केली असून उद्या शनिवारी शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत जामखेड मधील एक बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत आहे. यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघात राजकीय वातावरण गरमागरम आहे.
सकल मराठा समाजाचे समन्वयक म्हणून अनेक वर्षे काम केलेले तसेच गावोगावी तरूणांची फळी पाठिशी असणारे मंगेश (दादा) आजबे यांचे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नेटवर्क आहे. त्यांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश होत आहे. याचा फायदा आमदार रोहित पवार यांना होणार आहे.
तसेच मंगेश आजबे हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी अनेक वेळा रास्तारोको आंदोलन, रूमणे मोर्चा करत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत आंदोलने केलेली आहेत.
आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने केलेली कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी, दुधाला हमीभाव पन्नास रुपये जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी मिळावी, महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 च्या 2 लाखा वरील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, जे शेतकरी 50 हजार प्रोत्साहन पर अनुदानात वंचित राहिले आहे, अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान द्यावेत, जामखेड नगरपरिषद हद्दीतील शहर अंतर्गत असलेल्या गावांना ग्रामीण भागाप्रमाणे कृषी विभाग, पंचायत समिती योजनेंचा लाभ मिळावा, जामखेड तालुक्यामध्ये अजून पर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना, 25% अग्रीम पीक विम्याचे वाटप झालेले नाही तरी ते तात्काळ मिळावी.
वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षणासाठी तार कुंपण करण्यास शंभर टक्के अनुदान द्यावे, शेतकऱ्यांचे वीज बिल पूर्णपणे माफ करावे, शेतकऱ्यांचे अतिवृष्टी (पावसामुळे) पिकांचे नुकसान झालेल्या गावांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी आशा मागण्यांसाठी अनेक वेळा रस्त्यावर उतरून आंदोलन केलेले आहे.
तसेच शंभूराजे कुस्ती संकुल तर्फे जिजाऊ जयंती निमित्त दरवर्षी रक्तदान शिबिरांचे आयोजन करतात यात शेकडो तरूण उत्स्फुर्तपणे रक्तदान करतात. तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राज्यस्तरीय कुस्ती आखाडा भरवतात यासाठी देशभरातील मल्ल हजेरी लावतात. शंभूराजे कुस्ती संकुलामुळे परिसरात चांगले मल्ल तयार झाले आहेत मल्लांना मोफत प्रशिक्षण देतात.
कोरोना काळात परिसरातील गोरगरीब रूग्णांना मोठ्या प्रमाणात आधार देण्याचे काम आजबे यांनी केले आहे. आरोळे व्हाँस्पीटल ला धान्य भाजीपाला व रोख रक्कम मोठ्या प्रमाणात गावोगावी जाऊन गोळा केली होती. यामुळे गोरगरिबांना मोफत उपचार मिळाले होते.
आमदार रोहित पवार यांना एक चळवळीतील. तरूणांची फळी मागे असणारा नेता मिळाला आहे. मंगेश आजबे यांचा उद्या शनिवारी खर्डा येथे शरदचंद्र पवार साहेब, शाहु महाराज व भुषणसिंग होळकर यांच्या उपस्थितीत शेकडो समर्थकासह राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश होत आहे.