जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच अधिकारी जनता व लोकप्रतिनिधींमध्ये सुसंवाद साधला जावा म्हणून आमदार आपल्या दारी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामुळे जनतेला तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागणार नाहीत. याचबरोबर आलेल्या तक्रारीचा निपटारा झाला कि नाही हे पाहण्यासाठी दर तीन महिन्यांला असा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले
आमदार आपल्या दारी आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत साकत ग्रामपंचायतीने महसुल, पंचायत समिती, कृषी, महावितरण, भूमिअभिलेख व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सरपंच हनुमंत पाटील यांनी
कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, कृषी अधिकारी सुधीर शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ, आरोग्य अधिकारी डॉ सुनील बोराडे, नायबतहसीलदार नवनाथ लांडगे, गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे, बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर, भूमी अभिलेख अधिकारी मनिषा धीवर, महावितरणचे गावीत, कामगार तलाठी सचिन खेत्रे, ग्रामसेवक राजेंद्र वळेकर सह अनेक विभागातील अधिकारी व अनेक गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
साकत गणातील कोल्हेवाडी, जातेगाव, जायभायवाडी, तेलंगशी, दिघोळ, माळेवाडी, देवदैठन, धामणगाव, नायगाव, नाहुली, पिंपळवाडी, फाळकेवाडी, शिऊर, मोहरी मोहा, साकत व सावरगाव या गावातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, सर्व सामान्य नागरीकांना तालुक्याच्या ठिकाणी कामासाठी चकरा माराव्या लागतात अधिकारी भेटत नाहीत अडचणी येतात. या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची माहिती व्हावी म्हणून गण निहाय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे असे पवार म्हणाले
यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड म्हणाले की, आमदार रोहित पवारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहरातील रहदारीची समस्या सोडवली, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व उपाययोजना केलेल्या आहेत. खोट्या केसेस खुपच कमी झालेल्या होत्या, भरोसा सेल चे काम उल्लेखनीय आहे. महिला दक्षता कमिटी स्थापन करून समस्या सोडवल्या, शाळा महाविद्यालयात तक्रार पेटी बसवल्या, दोन दुचाकी व दोन चारचाकी वाहने, चार पोलीस चौक्या मिळाल्या, गुन्हेगारी कमी झाली आहे. पोलीस वसाहतीचे काम मार्गी लागले आहे. सावकारकीच्या विळख्यात जामखेड बाहेर आले आहे. तसेच पोलीसांनी सामाजिक उपक्रम राबवत
कोरोना काळात रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते चांगला प्रतिसाद मिळाला तसेच ग्रामपंचायत निवडणूकीच्या काळात एकही साधा गुन्हा दाखल झालेला नाही हे खरे यश आहे.
यावेळी बोलताना तहसीलदार विशाल नाईकवाडे म्हणाले की, लोकप्रतिनिधी, अधिकारी व सामान्य जनतेत सुसंवाद साधण्यासाठी आमदार आपल्या दारी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. लहान मुलांसाठी १२० बेड राखीव ठेवल्या आहेत. सर्व सामान्य रूग्णांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, लसीकरण प्रत्येक गावात करण्याचा प्रयत्न करत आहोत. हिवरे बाजार पॅटर्न प्रत्येक गावात राबवावा त्यामुळे कोरोनाला आपण रोखू शकू, पोटखराब क्षेत्र लागवडी खाली आणले. जिल्ह्य़ात जामखेड तालुक्याने पुरवठा विभागाचे इष्टांक पुर्ण केलेले आहे. 1156 हेक्टर क्षेत्र पोटखराब लागवडी आणली आहे.
गटविकास अधिकारी परशुराम कोकणी म्हणाले की,
पंचायत समितीच्या नऊ योजना मिळतात पाच जिल्ह्य़ांमध्ये घरकुले पुर्ण करण्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. पात्र लाभार्थीनी आपापले प्रस्ताव सादर कराव्यात म्हणजे लाभ मिळेल. मी समृद्ध तर गाव समृद्ध हे अभियान सुरू आहे.
तालुकाकृषी अधिकारी सुधीर शिंदे म्हणाले की,
परिसरातील शेतकऱ्यांनी चालू वर्षी घरचे बियाणे वापरल्याने शंभर टक्के उगवण क्षमता झाली.
शेती यांत्रिकीकरणाचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन करणे आवश्यक आहे. कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिंदे यांनी केले.
यावेळी साकत ग्रामपंचायतीने कोरोना काळात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित केले यामधे तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ, आरोग्य अधिकारी सुनील बोराडे, तलाठी सचिन खेत्रे, ग्रामसेवक राजेंद्र वळेकर, डॉ. सुनिल वराट, डॉ. अजय वराट, पोलीस पाटील महादेव वराट, पत्रकार सुदाम वराट, बाळासाहेब वराट, समुदाय आरोग्य अधिकारी प्रशांत पाखरे, आरोग्य सेवक मुबारक शेख, सेविका मंदा शिंदे, शांतीताई शिरोळे, मनिषा वराट, छाया वराट, मनिषा सानप, ज्योती लहाने, लता नेमाने, स्वाती कोल्हे यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.