राजुरीचे पोलीस पाटील दत्तात्रय मोरे यांना आदर्श पोलीस पाटील पुरस्कार

0
431

जामखेड न्युज——–

राजुरीचे पोलीस पाटील दत्तात्रय मोरे यांना आदर्श पोलीस पाटील पुरस्कार

जामखेड तालुक्यातील राजुरी येथील कर्तव्यदक्ष पोलिस पाटील दत्तात्रय मोरे यांना या वर्षीचा आदर्श पाटील पाटील पुरस्कार कर्जत उपविभागातून देण्यात आला आहे. याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जामखेड तालुक्यातील राजुरी गावचे पोलीस पाटील दत्तात्रय मोरे पाटील यांना उपविभाग कर्जत मधून आदर्श पाटील पुरस्कार मिळाला त्यांना प्रांताधिकारी नितीन पाटील याच्या हस्ते देण्यात आला आहे. गावातील महसूल व पोलीस प्रशासनाच्या जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळणे, जातीय सलोखा, उत्सव, गावातील तंटे गावातच मिटवणे, म्हणून निवड केली जाते.

यानिवडीबद्दल जामखेडचे तहसीलदार गणेश माळी , नायब तहसीलदार मनोज भोसेकर, इंगळे, काळे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, जामखेड तालुका पोलीस पाटील संघटना अध्यक्ष योगीनाथ जायभाय पाटील, महदेव वराट, अमोल गायकवाड, निलेश वाघ, कांतीलाल भोरे, संतोष उगले, सिद्धेश्वर पवार, बिभीषण यादव यांनी अभिनंदन केले आहे.

राजुरीचे पोलीस पाटील हे गेल्या पंधरा वर्षांपासून पोलीस पाटील म्हणून काम करत आहेत. गावात त्यांनी गावात तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, दारूबंदी हे उपक्रम प्राधान्याने राबवले तसेच शेतकऱ्यांचे बांधावरून होणारे वाद गावात मिटवले या कामाची दखल घेत पुरस्कार मिळाला आहे.

 

2012 साली गावात होणारी टावर वरील केबल चोरी पकडून चोराला पकडले होते याबद्दल त्यांना शासनाच्या वतीने प्रशस्तीपत्र देण्यात आले होते.

आदर्श पोलीस पाटील पुरस्काराबद्दल राजुरीचे सरपंच सागर कोल्हे, माजी सरपंच सुभाष काळदाते, गणेश कोल्हे, काकासाहेब कोल्हे, अँड. जयप्रकाश कोल्हे, डॉ. नाना खाडे, डॉ. तानाजी राळेभात, मच्छिंद्र कोल्हे, मल्हारी गायकवाड, भास्कर फुंदे, पोपट पिसाळ, सुरेश खाडे, ईश्वर कोळी, प्राचार्य अविनाश कंदले, दत्तात्रय डोंगरे, बळीराम मोरे, बाळू मोरे, डॉ. साईनाथ मोरे यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here