मला रोखण्यासाठी महाकाय शक्ती मीही दोन हात करण्यासाठी सज्ज – आमदार रोहित पवार लोकसभेची पुनरावृत्ती होणार, महायुती शंभरच्या आसपास राहणार

0
723

जामखेड न्युज——

मला रोखण्यासाठी महाकाय शक्ती मीही दोन हात करण्यासाठी सज्ज – आमदार रोहित पवार

लोकसभेची पुनरावृत्ती होणार, महायुती शंभरच्या आसपास राहणार

काहीच महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला आहे. त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला ७ -११ जागा, शिंदे गटाना १७-२२ जागा तर भाजपला ६२-६७ मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भाजपमध्ये भीती पसरली आहे. या सर्व्हेनंतर केंद्रातून हालचाली सुरु झाल्या असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

भाजपच्या अंतर्गत सर्व्हेवर रोहित पवार यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत सांगितलं की, अजित पवारांनी भाजपच्या एका बड्या नेत्याने काही ठराविक जागा ऑफर केल्या.

अजितदादांनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली तर ६ ते ७ जागा अतिरिक्त देण्याचीही ऑफर देण्यात आली आहे, असंही रोहित पवार म्हणाले.

कर्जत_जामखेड संदर्भात तर “कुछ भी कर के, अभी उसे वही पे रोको”, असं सांगितल्याने कर्जत_जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटेरेस्टिंग होणार हे नक्की आहे. पण मीही या महाकाय शक्तीसोबत दोन हात करायला सज्ज असून या महायुद्धात कर्जत-जामखेडकर स्वाभिमान आणि #निष्ठा काय असते, ते या महाशक्तीला दाखवून देतील, असा विश्वास आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात सध्या धामधूम पाहायला मिळत आहे. यंदाची निवडणूक मुख्यत्वे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगणार आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात ‘एक्स’ खात्यावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. राज्यात लक्षवेधी होणाऱ्या निवडणुकींपैकी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाची होणार, असे दिसते आहे.

रोहित पवारांनी केलेल्या ट्विटमध्ये कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघाविषयी, असं म्हटलं आहे की, ‘कुछ भी कर के, अभी उसे वही पे रोको’, असं सांगितल्याने कर्जत-जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटेरेस्टिंग होणार, हे नक्की आहे. पण मीही या महाकाय शक्तीसोबत दोन हात करायला सज्ज आहे. या महायुद्धात कर्जत-जामखेडकर स्वाभिमान आणि निष्ठा काय असते, ते या महाकायशक्तीला दाखवून देतील, असे विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here