रोहित पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांनी पक्षातील आपले स्थान तपासावे – राजश्रीताई मोरे संध्या सोनवणे यांनी डोळे उघडे ठेवून विकास पहावा

0
1695

जामखेड न्युज——

रोहित पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांनी पक्षातील आपले स्थान तपासावे – राजश्रीताई मोरे

संध्या सोनवणे यांनी डोळे उघडे ठेवून विकास पहावा

 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांनी आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयासमोर रस्ता व खड्डे याचा व्हिडिओ तयार करून हाच का विकास असे म्हटले याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला पदाधिकारी यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहेत.

संध्या सोनवणे यांना फक्त कार्यालयासमोर रस्ताच दिसला का❓ नागेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता दिसला नाही का❓शहरातील अनेक शासकीय इमारती दिसल्या नाहीत ना❓ उपजिल्हा रूग्णालय इमारत, पंचायत समिती शासकीय अधिकारी कर्मचारी निवासस्थान, पोलीस निवासस्थाने, शासकीय विश्रामगृह, पाणीपुरवठा योजना, कुसडगाव एसआरपी केंद्र या विकासाच्या योजना दिसल्या नाहीत का❓शहरासह ग्रामीण भागात आमदार रोहित पवार यांनी अनेक उल्लेखनीय कामे केलेली आहेत. सध्या सोनवणे यांनी महायुतीचा चष्मा काढून निरपेक्ष भावनेने पहावे किंवा समोरासमोर यावे त्यांना आम्ही विकासकामे सांगतोत असे पंचायत समितीच्या माजी सभापती राजश्री मोरे यांनी सांगितले.

संध्या सोनवणे तुम्ही युवती प्रदेशाध्यक्ष आहात तरी सुद्धा युवती कार्याध्यक्ष निर्मलाताई नवले तुम्ही प्रदेशाध्यक्ष असूनही तुमचा फोटो एकाही बॅनरवर का टाकत नाहीत याचं आत्मपरीक्षण करा आणि मग आमचे नेते कर्जत जामखेडचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार मा श्री रोहित दादा पवार यांच्यावर टीका करा, राहिला विषय जामखेडची बारामती करण्याचा तर जामखेड मध्ये 05 वर्षापूर्वी जी पारिस्थी होती त्यामधे अमुलाग्र बदल झालेला आहे फक्त तो दिसण्यासाठी तुम्हाला महायुतीचा चष्मा काढून ठेवावा लागेल, तुम्ही म्हणता 05 वर्षामध्ये काहीही काम झाली नाही.

 

ताई तालुक्यात जी काही विकास काम झाली आहेत ती काम माहीत होण्यासाठी तालुक्यातील गावागावांमध्ये जावं लागत आपण पुण्यात बसून जर गप्पा मारायला लागलात तर तुम्हाला सत्य परिस्थिती समजणार नाही, 05 वर्षामध्ये मतदारसंघाचा खराखुरा चेहरा मोहरा बदलण्याचे काम रोहित दादा पवार यांनी केले आहे.

राहिलेले काम येणाऱ्या काळात नक्कीच पूर्ण केली जातील हा विश्वास माझ्यासहित मतदारसंघातील जनतेला आहे त्यामुळे आपण आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी रोहित दादा पवार यांच्यावरती टीका करू नये अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल. 

सौ राजश्रीताई सूर्यकांत मोरे महिला तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जामखेड तालुका तथा माजी सभापती पंचायत समिती जामखेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here